Home महाराष्ट्र तुम्ही काड्या करा, आम्ही बांबू…; सत्ताधाऱ्यांवर टीका करताना खासदार संजय राऊतांची जीभ...

तुम्ही काड्या करा, आम्ही बांबू…; सत्ताधाऱ्यांवर टीका करताना खासदार संजय राऊतांची जीभ घसरली

186

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नाशिक : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर आता ठाकरे गटाचे नेत संजय राऊत यांचंही सदस्यत्वही धोक्यात आलं आहे. यावर आता संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे.

ज्यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार आहे ते हक्कभंग समितीमध्ये आहेत. ज्यांच्यावर मी भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे पुरावे दिले आहेत ते हक्कभंग समितीचे अध्यक्ष आहेत. अशा समितीपुढे कुणाला न्याय मिळू शकतो? मी काही चुकीचं बोललो नाही., असं संजय राऊत म्हणाले.

हे ही वाचा : उद्धव ठाकरेंच्या सभेचे ऊर्दूत बॅनर, बॅनरची जोरदार चर्चा!

सर्वोच्च न्यायालयात चोर मंडळाच्या बाबतीत प्रकरण प्रलंबित आहे. एका विशिष्ट गटापुरता तो शब्द आहे. ज्या विधिमंडळाने मला राज्यसभेत चारवेळा निवडून पाठवलं त्या विधिमंडळाबद्दल मी अपशब्द कसा वापरेल? ठिक आहे, संजय राऊत याच्याविरोधात काहीना काही काड्या करत राहायच्या. तुम्ही काड्या करा, आम्ही बांबू घालू, असा घणाघात संजय राऊतांनी यावेळी केला.

महत्त्वाच्या घडामोडी –

राहुल गांधींची खासदारकी रद्द केल्यानंतर महाविकास आघाडीचे नेते आक्रमक; तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून केला निषेध

एकनाथ शिंदेंमध्ये हिंमत असेल तर….; संजय राऊत यांचं खुलं आव्हान

भाजप आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असतील तर…; शिंदेकडून प्रतिक्रिया