हायकोर्टाने कारवाई बाबत प्रश्न विचारले.. मुंढे नी थेट हायकोर्टाच्या कँटीन वरच छापा..

0
303

मुंबई | प्रतिनिधी

मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने गुरुवारी मुंबई उच्च न्यायालय परिसरातील कॅन्टीनची अचानक तपासणी केली. या कारवाईदरम्यान कॅन्टीनमधील स्वच्छता, अन्न सुरक्षा नियमांचे पालन, FSSAI परवाना, अन्न साठवणुकीची व्यवस्था, स्वयंपाकघराची स्वच्छता तसेच कर्मचाऱ्यांच्या आरोग्य व स्वच्छतेची सखोल पाहणी करण्यात आली.

उच्च न्यायालयाने राज्य सरकारला सुरू असलेली FDA ची तपासणी मोहीम केवळ खासगी हॉटेल व उपहारगृहांपुरती मर्यादित न ठेवता, सरकारी आणि निमसरकारी संस्थांमधील कॅन्टीनचीही तपासणी होत आहे का, याबाबत माहिती सादर करण्यास सांगितले होते. या पार्श्वभूमीवर FDA चे पथक थेट मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाले.

या तपासणीचा उद्देश न्यायालयीन परिसरात येणारे वकील, कर्मचारी, पक्षकार आणि सर्वसामान्य नागरिकांना सुरक्षित व दर्जेदार अन्न उपलब्ध होत आहे की नाही, याची खात्री करणे हा आहे. तपासणीत आढळणाऱ्या त्रुटींवर आवश्यक ती कारवाई करण्यात येणार असून, अन्न सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश संबंधितांना देण्यात आले.

राज्यात अन्न सुरक्षेबाबत सुरू असलेल्या विशेष मोहिमेचा भाग म्हणून सरकारी कार्यालये, मंत्रालय तसेच इतर सार्वजनिक संस्थांमधील कॅन्टीनचीही तपासणी पुढील काळात सुरू राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here