Utkarsh Creations : उत्कर्ष क्रिएशन्सला ‘बेस्ट अबॅकस इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट अवॉर्ड’

0
8

पुणे : अबॅकस शिक्षण क्षेत्रातील उत्कृष्ट कार्य, विद्यार्थ्यांची सातत्यपूर्ण आंतरराष्ट्रीय कामगिरी आणि गुणवत्तापूर्ण प्रशिक्षणाची दखल घेत उत्कर्ष क्रिएशन्स या संस्थेला तैवान येथे आयोजित आंतरराष्ट्रीय स्पर्धेदरम्यान प्रतिष्ठेचा ‘Best Abacus International Institute Award’ प्रदान करण्यात आला.

हा बहुमान स्वीकारताना संस्थेचे संस्थापक अमित शिंदे आणि संचालिका संध्या शिंदे यांनी भारतीय पारंपरिक वेशभूषेत उपस्थित राहून भारतीय संस्कृती, परंपरा आणि मूल्यांचे आंतरराष्ट्रीय स्तरावर अभिमानाने प्रतिनिधित्व केले. त्यामुळे हा क्षण संस्थेसाठी तसेच भारतासाठीही अत्यंत गौरवास्पद ठरला.

उत्कर्ष क्रिएशन्सने अबॅकस, वेदिक मॅथ्स आणि कौशल्य विकासाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर घवघवीत यश मिळवून दिले आहे. विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, एकाग्रता, गणितीय कौशल्य आणि मानसिक विकास घडवून आणण्यात संस्थेचे मोलाचे योगदान आहे.

यावेळी संस्थापक अमित शिंदे यांनी सांगितले, “हा पुरस्कार उत्कर्ष क्रिएशन्सच्या संपूर्ण परिवाराच्या अथक परिश्रमाचे आणि गुणवत्तेप्रती असलेल्या बांधिलकीचे प्रतीक आहे. भविष्यातही जागतिक दर्जाचे शिक्षण देत भारताचे नाव अधिक उंचावण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”

तसेच संचालिका संध्या शिंदे यांनी सांगितले, “हा पुरस्कार आमच्या प्रत्येक विद्यार्थी, पालक, शिक्षक, फ्रँचायझी आणि सहकाऱ्यांच्या विश्वासाचे आणि मेहनतीचे फळ आहे. हा सन्मान आम्हाला अधिक जोमाने आणि गुणवत्तेने कार्य करण्याची प्रेरणा देणारा आहे.”

या आंतरराष्ट्रीय पुरस्कारामुळे उत्कर्ष क्रिएशन्सच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून, संस्थेने भारताचे नाव जागतिक स्तरावर पुन्हा एकदा अभिमानाने उंचावले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here