Home महत्वाच्या बातम्या राहुल गांधींची खासदारकी रद्द केल्यानंतर महाविकास आघाडीचे नेते आक्रमक; तोंडाला काळ्या...

राहुल गांधींची खासदारकी रद्द केल्यानंतर महाविकास आघाडीचे नेते आक्रमक; तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून केला निषेध

192

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राहुल गांधी यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान सर्व चोरांचे आडनाव मोदी कसे? असा सवाल करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती.याप्रकरणी काल सुरत न्यायालयाने राहुल गांधी यांना दोषी ठरवत दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे.

राहुल गांधी यांच्यावर झालेल्या कारवाई संदर्भात आज महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्‍यांवर ठाण मांडत तोंडावर काळया पट्टया बांधून मूक आंदोलन केलं.

हे ही वाचा : एकनाथ शिंदेंमध्ये हिंमत असेल तर….; संजय राऊत यांचं खुलं आव्हान

राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर त्याचे पडसाद शुक्रवारीही विधानसभेत उमटले होते. आता आज पुन्हा एकदा विधानसभेचं कामकाज सुरू होण्यापूर्वी महाविकास आघाडीच्या आमदारांनी केंद्र सरकारचा निषेध अशा पद्धतीने नोंदवला.

महत्त्वाच्या घडामोडी –

भाजप आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असतील तर…; शिंदेकडून प्रतिक्रिया

राहुल गांधी यांची खासदारकी गेल्यानंतर आता शरद पवार उतरले मैदानात, म्हणाले…

 मोठी बातमी! लोकसभा सचिवालयाची कारवाई, राहुल गांधी यांची खासदारकी रद्द