क्राफ्टिझन फाउंडेशनतर्फे बौद्धिक दिव्यांग प्रौढांच्या उपजीविका सक्षमीकरणासाठी प्रशिक्षणार्थी प्रशिक्षक कार्यक्रम यशस्वी

0
78

पुणे :  २० जून २०२६: बौद्धिक दिव्यांग प्रौढांच्या उपजीविका संधी अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने क्राफ्टिझन फाउंडेशनतर्फे १५ ते २० जून २०२६ दरम्यान सहा दिवसीय “प्रशिक्षणार्थी प्रशिक्षक” (Training of Trainers – ToT) कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमांतर्गत मॉड्यूल २ चे प्रशिक्षण १५ ते १७ जून आणि मॉड्यूल ३ चे प्रशिक्षण १८ ते २० जून या कालावधीत पुणे येथील जे. पी. नाईक सेंटरमध्ये पार पडले.

या प्रशिक्षणात महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल राज्यांतील बौद्धिक दिव्यांग व्यक्तींसोबत कार्य करणाऱ्या विविध स्वयंसेवी संस्थांचे मास्टर ट्रेनर्स आणि प्रतिनिधींनी उत्साहाने सहभाग नोंदविला. सहभागीांना उत्पादन निर्मिती, गुणवत्ता व्यवस्थापन, उपजीविका कौशल्ये, प्रशिक्षण पद्धती आणि सामाजिक उद्योग उभारणी यांसंबंधी सखोल व प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आले.

हा उपक्रम बजाज फिनसर्व्ह आणि अॅक्सेन्चर यांच्या सहकार्याने राबविण्यात आला. या संस्थांच्या पाठबळामुळे बौद्धिक दिव्यांग प्रौढांसाठी कौशल्यविकास व बाजारपेठेशी जोडलेल्या उपजीविका संधी निर्माण करण्याच्या क्राफ्टिझनच्या प्रयत्नांना अधिक बळ मिळत आहे.

मॉड्यूल २ च्या समारोप समारंभास निर्माण फाउंडेशनचे संचालक श्री. संतोष जाधव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी सहभागी प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्रांचे वितरण करून समावेशक उपजीविका निर्माण करण्यासाठी कार्यरत संस्थांच्या प्रयत्नांचे कौतुक केले.

मॉड्यूल ३ च्या समारोप समारंभास सीवायडीए (CYDA) चे संयुक्त संचालक डॉ. नितीन जाधव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी प्रमाणपत्रांचे वितरण करताना सहभागी प्रशिक्षकांना आपल्या कार्यक्षेत्रात परिवर्तनाचे वाहक बनण्याचे आवाहन केले.

या प्रसंगी क्राफ्टिझन फाउंडेशनच्या संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. मयुरा बालसुब्रमणियन यांनी देशभरात दर्जेदार प्रशिक्षण पोहोचविण्यासाठी सक्षम मास्टर ट्रेनर्सची फळी उभारण्याचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रम संचालक सौ. तुलसी स्वर्ण लक्ष्मी यांनी विविध भागीदार संस्थांच्या सहकार्यामुळे उपजीविका क्षेत्रातील परिणामकारकता वाढत असल्याचे सांगितले.

या कार्यक्रमाचे समन्वयन वरिष्ठ कार्यक्रम व्यवस्थापक श्री. शिवरुद्र लुपणे यांनी केले. प्रशिक्षण सत्रांचे संचालन श्री. कार्तिक सी., सौ. आकांक्षा गुप्ता, सौ. सिद्धी अवस्थी आणि सौ. पायल कुमारी यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी क्राफ्टिझनचे विभागीय व्यवस्थापक श्री. भरत राऊत, सौ. प्रिया शिंदे, श्री. रमण टेकाळे आणि श्री. नीरज शर्मा यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.

बौद्धिक दिव्यांग प्रौढांना कौशल्यविकास, उद्यमशीलता आणि शाश्वत उपजीविका संधी उपलब्ध करून देण्याच्या क्राफ्टिझन फाउंडेशनच्या व्यापक ध्येयाचा हा प्रशिक्षण कार्यक्रम एक महत्त्वाचा टप्पा ठरला असून, सहभागी प्रशिक्षकांमार्फत देशातील विविध भागांत या उपक्रमाचा लाभ अधिकाधिक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणार आहे.

महत्वाच्या बातम्या –

सख्ख्या भावाचाच गेम? विधानपरिषद उमेदवारीवरून गोरे बंधूंमध्ये धुसफूस!

टारगेट पूर्ण करा.. पक्षाला निधी द्या अन्यथा राजीनामा द्या पार्थ पवारांचा आमदार-मंत्र्यांना नवीन फर्मान..!

केवळ ३०० रु गोपाळगड किल्ल्याचे मालक युनूस हुसैन मणियार कसे झाले?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here