Home पुणे भाजप आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असतील तर…; शिंदेकडून प्रतिक्रिया

भाजप आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असतील तर…; शिंदेकडून प्रतिक्रिया

331

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

शिर्डी : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानभवनात एकत्र आले होते. यानंतर राजकीय वर्तुळात ठाकरे आणि भाजप युतीच्या चर्चा रंगल्या. त्यावर शिंदे गटाचे नेते आणि कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अनेक वर्ष ठाकरे आणि फडणवीसांनी सोबत काम केलं आहे. जर ते पुन्हा एकत्र येणार असतील तर आम्हाला मान्य आहे, असं अब्दुल सत्तार यांनी म्हटलं आहे.

हे ही वाचा : राहुल गांधी यांची खासदारकी गेल्यानंतर आता शरद पवार उतरले मैदानात, म्हणाले…

देवेंद्रजी जे करतात ते विचारपूर्वक करतात, त्यांची इच्छा असेल तर हे होवू शकते. राजकारणात कधी काय होईल? सांगता येत नाही, त्यामुळे देवेंद्रजींनी जर निर्णय घेतला तर तो सर्वांना मान्य राहील, असंही अब्दुल सत्तार म्हणाले आहेत.

दरम्यान शिर्डीमध्ये सुरू झालेल्या तीन दिवसांच्या महापशुधन एक्सपोचं कृषी मंत्री अब्दुल सत्तार आणि पशूसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झालं. त्यावेळी ते बोलत होते.

महत्त्वाच्या घडामोडी –

 मोठी बातमी! लोकसभा सचिवालयाची कारवाई, राहुल गांधी यांची खासदारकी रद्द

मोठी बातमी! लोकसभा सचिवालयाची कारवाई, राहुल गांधी यांची खासदारकी रद्द

“उद्धव ठाकरे आमच्याबरोबर आले, तर आनंदच होईल”