Home महाराष्ट्र उद्धव ठाकरेंच्या सभेचे ऊर्दूत बॅनर, बॅनरची जोरदार चर्चा!

उद्धव ठाकरेंच्या सभेचे ऊर्दूत बॅनर, बॅनरची जोरदार चर्चा!

200

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मालेगाव : उद्धव ठाकरे यांचा महाराष्ट्रभर दौरा सुरू आहे नुकतीच खेडची सभा झाल्यानंतर उद्धव ठाकरे हे मालेगावमध्ये सभा घेत आहे. उत्तर महाराष्ट्रासाठी ही सभा असणार आहे. सभेची जोरदार तयारी केली जात आहे.

एकीकडे या सभेला एक लाख नागरिक उपस्थित असण्याची शक्यता संजय राऊत यांनी वर्तवली आहे. तर दुसरीकडे मालेगावचे अद्वय हिरे यांच्याकडून जोरदार तयारी केली जात आहे. त्यासाठी ठिकठिकाणी बॅनरबाजी केली जात असून सभेसाठी सर्वांना निमंत्रित केले जात आहे.

हे ही वाचा : राहुल गांधींची खासदारकी रद्द केल्यानंतर महाविकास आघाडीचे नेते आक्रमक; तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून केला निषेध

हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून एकीकडे राज्यभरात राजकीय वातावरण ढवळून निघालेले असतानाच मालेगाव मध्ये या सभेला जास्तीत जास्त मुस्लिम बांधवांनी उपस्थित राहावे यासाठी ठाकरे गटाच्या वतीने उर्दूमध्ये बॅनर मालेगावच्या चौका चौकात लावण्यात आलेले आहेत.

दरम्यान, सध्या रमजानचा महिना सुरू आहे आणि त्यामुळे या सभेला जास्तीत जास्त मुस्लिम बांधवांनी उपस्थित राहावे यासाठी विशेष प्रयोजन केले जात आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून मुस्लिम बहुल भागांमध्ये अशा पद्धतीने उद्धव ठाकरे यांचे फोटो असलेले बॅनर लावले असून उर्दू भाषेतून या सभेचे निमंत्रण देण्यात आले आहे.

महत्त्वाच्या घडामोडी –

एकनाथ शिंदेंमध्ये हिंमत असेल तर….; संजय राऊत यांचं खुलं आव्हान

भाजप आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असतील तर…; शिंदेकडून प्रतिक्रिया

राहुल गांधी यांची खासदारकी गेल्यानंतर आता शरद पवार उतरले मैदानात, म्हणाले…