Home महाराष्ट्र शितल म्हात्रे व्हिडिओ प्रकरणी मोठी माहिती समोर, ठाकरे गटाला मिळाला मोठा दिलासा

शितल म्हात्रे व्हिडिओ प्रकरणी मोठी माहिती समोर, ठाकरे गटाला मिळाला मोठा दिलासा

360

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : शिवसेना नेत्या शीतल म्हात्रे व्हायरल व्हिडीओ प्रकरणी एक मोठी माहिती समोर आली आहे.

मुंबई पोलिसांनी या प्रकरणी युवासेनेचे साईनाथ दुर्गे यांच्यासह सात जणांना अटक केली होती. या सातही जणांना आज अखेर जामीन मिळाला आहे. त्यामुळे उद्या त्यांची जेलमधून सुटका होणार आहे. त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा दिलासा मिळाला आहे.

हे ही वाचा : “राज ठाकरेंनी अल्टिमेटम दिल्यानंतर अखेर सांगलीतील ‘ते’ अनधिकृत बांधकाम हटवलं”

साईनाथ दुर्गे हे युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय आहेत. तसेच जवळपास 10 दिवसांनी त्यांची जेलमधून मुक्तता होणार आहे. पक्षासाठी ही दिलासा देणारी बातमी आहे. तसेच साईनाथ दुर्गे यांना पोलीस कोठडी सुनावली, तेंव्हा आदित्य ठाकरे यांनी साईनाथ यांच्या दादरच्या घरी जावून त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली होती.

दरम्यान, यावेळी बोलताना, आदित्य ठाकरे यांनी, साईनाथ आमचा वाघ आहे. तो अन्यायाच्या विरुद्ध लढतोय., अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरेंनी साईनाथ यांच्या कुटूंबाला भेट दिल्यानंतर दिली होती.

महत्त्वाच्या घडामोडी –

‘एकदा हातात सत्ता द्या, मग महाराष्ट्र….; राज ठाकरेंचा जनतेला आवाहन

“ठाकरेंचा शिंदे गटाला दणका, मंत्री शंभूराज देसाईंचा त्यांच्याच गावात पराभव, ठाकरे गटाची एकहाती सत्ता”

शिवसेना आणि धनुष्यबाणाच्या वादावर राज ठाकरेंची पहिल्यांदाच प्रतिक्रिया, म्हणाले…