Home महाराष्ट्र “राज ठाकरेंनी अल्टिमेटम दिल्यानंतर अखेर सांगलीतील ‘ते’ अनधिकृत बांधकाम हटवलं”

“राज ठाकरेंनी अल्टिमेटम दिल्यानंतर अखेर सांगलीतील ‘ते’ अनधिकृत बांधकाम हटवलं”

208

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

सांगली : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल शिवतीर्थावर म्हणजेच शिवाजी पार्क मैदानावरून महाराष्ट्राला संबोधित केलं. यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं.

यावेळी राज यांनी सांगलीच्या कुपवाड येथील शाळेसाठी आरक्षित असलेल्या जागेवर उभारण्यात आलेल्या वादग्रस्त प्रार्थनास्थळाचे बांधकाम अनाधिकृत असल्याचं सांगितलं होतं. तसेच या अनधिकृत प्रार्थनास्थळाबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कालच्या गुढीपाडवा मेळाव्यात बोलताना, प्रशासनाने याबाबत कारवाई नाही केली, तर मनसैनिक ही बांधकाम पाडतील, असा इशारा दिला होता.

राज ठाकरेंनी इशारा दिल्यानंतर तातडीने महापालिकेच्या नगररचना विभागाने आजच कुपवाड येथील मंगलमूर्ती येथील जागेवर जाऊन पाहणी करीत मोजमापही केले. तर या ठिकाणी आज मनसेचे जिल्हा प्रमुख तानाजीराव सावंत, भाजपचे नितीन शिंदे यांनी देखील भेट देऊन पाहणी केली.

हे ही वाचा : ‘एकदा हातात सत्ता द्या, मग महाराष्ट्र….; राज ठाकरेंचा जनतेला आवाहन

कुपवाडमधील मंगलमूर्ती कॉलनीमध्ये शाळेसाठी आरक्षित असलेल्या जागेवर उभारण्यात आलेल्या वादग्रस्त प्रार्थनास्थळाचे बांधकाम अनाधिकृत असल्याचे महापालिकेच्या पाहणीत आढळले. त्यामुळे मस्जिद विश्वस्तांची मदत घेऊन महापालिकेच्या अतिक्रमण निर्मुलन पथकाने अवैध बांधकाम सायंकाळी हटवण्यास सुरुवात केली.

दरम्यान, मंगलमूर्ती कॉलनीमध्ये प्रार्थनास्थळ उभारण्यावरून फेब्रुवारी अखेरीस स्थानिक नागरिक व प्रार्थनास्थळाचे विश्‍वस्त यांच्यात वाद झाला होता. या प्रकरणी संजयनगर पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रारीही दाखल झाल्या असून 15 जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली असल्याची माहिती सहायक निरीक्षक संजय क्षिरसागर यांनी यावेळी दिली.

महत्त्वाच्या घडामोडी –

“ठाकरेंचा शिंदे गटाला दणका, मंत्री शंभूराज देसाईंचा त्यांच्याच गावात पराभव, ठाकरे गटाची एकहाती सत्ता”

शिवसेना आणि धनुष्यबाणाच्या वादावर राज ठाकरेंची पहिल्यांदाच प्रतिक्रिया, म्हणाले…

राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडले नसते, तर…; बाळा नांदगावकरांचं मोठं विधान