Home महाराष्ट्र “…तर बाळासाहेबांनी, अमित शहांना, मिस्टर इंडिया म्हटलं असतं; एकनाथ शिंदेंचं मोठं विधान

“…तर बाळासाहेबांनी, अमित शहांना, मिस्टर इंडिया म्हटलं असतं; एकनाथ शिंदेंचं मोठं विधान

109

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : काही दिवसांपूर्वी बोलताना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा उल्लेख ‘मोगॅम्बो’ असा केला होता. यावरून आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया देत आज अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला.

शिवसेनाप्रमुख हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी अमित शाह यांना ‘मिस्टर इंडिया’ म्हटलं असतं, असं विधान एकनाथ शिंदे यांनी केलं.

हे ही वाचा : “ब्रेकींग न्यूज! राज ठाकरेंचे अत्यंत जवळचे नेते अविनाश जाधव यांना जीवे मारण्याची धमकी”

दरम्यान, देशाचे, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी 370 कलम हटवलं. त्यांच्याविरोधात काही विरोधक वक्तव्य करतात, त्यांना ‘मोगॅम्बो’ म्हणतात. ‘मोगॅम्बो’ हा ‘मिस्टर इंडिया’ चित्रपटातील व्हिलन होता. पण बाळासाहेब ठाकरे हयात असते तर त्यांनी अमित शाहांना ‘मिस्टर इंडिया’ म्हटलं असतं. त्यांचा सन्मान केला असता. यासाठी मोठं मन लागतं, याला कद्रुपणा चालत नाही., असं म्हणत एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला.

महत्त्वाच्या घडामोडी –

तुम्ही काड्या करा, आम्ही बांबू…; सत्ताधाऱ्यांवर टीका करताना खासदार संजय राऊतांची जीभ घसरली

उद्धव ठाकरेंच्या सभेचे ऊर्दूत बॅनर, बॅनरची जोरदार चर्चा!

राहुल गांधींची खासदारकी रद्द केल्यानंतर महाविकास आघाडीचे नेते आक्रमक; तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून केला निषेध