Home महाराष्ट्र “ब्रेकींग न्यूज! राज ठाकरेंचे अत्यंत जवळचे नेते अविनाश जाधव यांना जीवे मारण्याची...

“ब्रेकींग न्यूज! राज ठाकरेंचे अत्यंत जवळचे नेते अविनाश जाधव यांना जीवे मारण्याची धमकी”

317

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

ठाणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे अत्यंत जवळचे नेते तसेच मनसेचे ठाणे आणि पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना जीवे मारण्याची धमकी आल्याची माहिती समोर आली आहे.

या प्रकरणी मनसे ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे यांनी ठाण्याच्या नौपाडा पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली आहे. सोशल मीडियावर एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. संबंधित ऑडिओ क्लिपमध्ये अविनाश जाधव यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोप करण्यात येतोय.

हे ही वाचा : उद्धव ठाकरेंच्या सभेचे ऊर्दूत बॅनर, बॅनरची जोरदार चर्चा!

दरम्यान, अविनाश जाधव यांनी मुंब्रा येथील डोंगरावर अनधिकृत दर्ग्यांवर चौकशी करून हटवण्याची मागणी केली होती. त्यानंतर आता त्यानंतर सोशल मीडियावर एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये ‘हम उसे जिंदा नही छोडेंगे, ये बच नही पाएंगे’, असा उल्लेख करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. संबंधित ऑडिओ क्लिपसोबत एक मेसेजही व्हायरल होतोय. त्यामध्ये ‘बॉयकॉट अविनाश जाधव’ असा उल्लेख आहे.

महत्त्वाच्या घडामोडी –

उद्धव ठाकरेंच्या सभेचे ऊर्दूत बॅनर, बॅनरची जोरदार चर्चा!

राहुल गांधींची खासदारकी रद्द केल्यानंतर महाविकास आघाडीचे नेते आक्रमक; तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून केला निषेध

एकनाथ शिंदेंमध्ये हिंमत असेल तर….; संजय राऊत यांचं खुलं आव्हान