Home मनोरंजन मुंबईमधील ड्रॅगनफ्लाय क्लबवर पोलिसांचा छापा; सुरेश रैना, सुझेन खानसह 34 जणांवर गुन्हा...

मुंबईमधील ड्रॅगनफ्लाय क्लबवर पोलिसांचा छापा; सुरेश रैना, सुझेन खानसह 34 जणांवर गुन्हा दाखल

मुंबई : मुंबईमधील ड्रॅगनफ्लाय क्लबवर पोलिसांनी छापा टाकत कारवाई केली. या कारवाईमध्ये भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू सुरेश रैना, बॉलिवूड अभिनेता ह्रतिक रोशनची पत्नी सुझेन खान यांच्यासह 34 जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एएनआयने यासंबंधी माहिती दिली आहे.

मुंबई पोलिसांनी एएनआयशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार, मध्यरात्री 2.30 वाजता ही कारवाई करण्यात आली. माजी भारतीय क्रिकेटर आणि इतर काही सेलिब्रेटींसोबत एकूण 34 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरोनाशी संबधित नियमांचं पालन केल्याने तसंच वेळमर्यादा संपल्यानंतरही क्लब सुरु ठेवण्यात आल्याने ही कारवाई करण्यात आली आहे., असं मुंबई पोलिसांनी सांगितलं.

महत्वाच्या घडामोडी-

“धक्कादायक! लंडनहून विमानाने भारतात आलेले ‘इतके’ प्रवासी आढळले कोरोना पाॅझिटिव्ह”

राज्यातील पालिका हद्दीत लावण्यात आलेली रात्रीची संचारबंदी हा मूर्खपणाचा निर्णय- इम्तियाज जलील

“गद्दार राणेंना बाळासाहेबांचं नाव घेण्याचा अधिकार नाही”

स्वतः राजकारण करायचं आणि भाजपावर राजकीय आरोप करून चर्चेत रहायचं- प्रविण दरेकर