Home महाराष्ट्र आम्ही उद्धव ठाकरेंकडे उद्याचे पंतप्रधान म्हणून पाहतोय- संजय राऊत

आम्ही उद्धव ठाकरेंकडे उद्याचे पंतप्रधान म्हणून पाहतोय- संजय राऊत

मुंबई : उद्धव ठाकरेंकडे आम्ही उद्याचे देशाचे पंतप्रधान म्हणून पाहतोय. आता राज्याच्या सीमा ओलांडण्याची आणि देशाचं नेतृत्व करण्याची वेळ आली आहे, असं वक्तव्य शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलं आहे. ते शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात बोलत होते.

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असल्यामुळेच कोरोना संकटावर मात करू शकतोय. पूर्ण सत्ता जेव्हा शिवसेनेची येईल, सेनेचे 180 आमदार येतील, तेव्हाच तुम्ही मुख्यमंत्री व्हाल, तेव्हाच स्वप्न पूर्ण होईल, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, पक्षाचा विचार आणि सरकार एकत्र चाललं पाहिजे. सत्तेवर असल्याचं भान ठेवून काम करावं लागेल, असंही राऊत म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

“अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी म्हणून शिवसेनेचा जन्म झाला”

…म्हणून आता लपून-छपून बैठका घ्याव्या लागतात; आशिष शेलारांचा मुख्यमंत्र्यांना टोला

… तर भाजपा ठाकरे सरकारला पाठिंबा देईल; ‘या’ भाजपा नेत्याचं मोठं विधान

“शिवसेनेचा 54 वा वर्धापन दिन; उद्धव ठाकरे पक्षाची पुढील वाटचाल सांगणार”