Home महाराष्ट्र “शिवसेनेचा 54 वा वर्धापन दिन; उद्धव ठाकरे पक्षाची पुढील वाटचाल सांगणार”

“शिवसेनेचा 54 वा वर्धापन दिन; उद्धव ठाकरे पक्षाची पुढील वाटचाल सांगणार”

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेचा आज 54 वा वर्धापन दिन आहे. वर्धापन दिनाच्या निमित्ताने शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दुपारी 12.30 वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे शिवसेना नेते संवाद साधून मार्गदर्शन करणार आहेत.

महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर आणि उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळल्यानंतर हा शिवसेनेचा पहिला वर्धापन दिन आहे.

1995 मध्ये युती सरकारनंतर आज 25 वर्षांनी पुन्हा एकदा शिवसेनेचा मुख्यमंत्री राज्यात आहे. त्यामुळे यावर्षी शिवसेनेने मोठ्या जल्लोष सोहळ्याचं आयोजन करण्याचं ठरवलं होतं. मात्र कोरोनाच्या संसर्गामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी सर्व शिवसैनिकांना या काळात शंभर टक्के समाजकारण करण्याचा आदेश दिला आहे.

दरम्यान, 54 वर्षांच्या शिवसेनेची भविष्यातील वाटचाल कशी असेल या संदर्भात शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवसैनिकांना फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संबोधित करतील.

 

महत्वाच्या घडामोडी-

लातूर जिल्हा परिषदेच्या प्रांगणात विलासरावांच्या बाजूला गोपीनाथरावांचं स्मारक उभारणार

कोल्हापूर सांगलीत पूर परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून…; देवेंद्र फडणवीसांच मुख्यमंत्र्यांना पत्र

“चीनला पाठिंबा देणाऱ्या काश्मिरींना ओमर अब्दुल्लांनी चांगलंच सुनावलं”

“ट्रम्प यांनी चीनला दिला दणका; अडचणीत आणणाऱ्या विधेयकावर केली स्वाक्षरी”