Home महाराष्ट्र कोल्हापूर सांगलीत पूर परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून…; देवेंद्र फडणवीसांच मुख्यमंत्र्यांना पत्र

कोल्हापूर सांगलीत पूर परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून…; देवेंद्र फडणवीसांच मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई : गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात सांगली कोल्हापूरला महापुर आला होता. महापूराचा प्रचंड मोठा तडाखा सांगली कोल्हापूरला बसला होता. याच पार्श्वभूमीवर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे.

कोल्हापूर सांगलीत पूर परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून अलमट्टी धरणातून विसर्गाबाबत कर्नाटकचे मुख्यमंत्री यांच्यासमवेत मुख्यमंत्रीस्तरिय बैठक घेऊन पूरपरिस्थिती येऊ नये यासाठी तसेच आपातकालिन स्थिती उद्भल्यास विसर्ग कसा असावा, याबाबत संयुक्त करार करण्यात यावा. अशी मागणी फडणवीसांनी या पत्रात केली आहे.

आपल्या धरणाच्या विसर्गात छोट्या-मोठ्या नद्यांचे पाणी येऊन मिळते आणि पुढे अलमट्टी धरणामुळे हे पाणी अडल्याने महाराष्ट्राची पाण्याची पातळी वाढून मोठ्या प्रमाणात पूरपरिस्थिती निर्माण होते. अशावेळी अलमट्टी धरणाचा विसर्ग वाढविणे, हाच पर्याय ठरतो, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

अलमट्टीचा जास्त विसर्ग वाढविला की कर्नाटकमध्ये पूरपरिस्थिती निर्माण होते. त्यामुळे आपल्या आवश्यकतेनुसार विसर्ग वाढवण्यास ते राजी नसतात त्यासाठी त्यांच्याकडे सारखा पाठपुरावा करावा लागतो. याच पार्श्वभूमीवर मी यापूर्वीही आपल्याला पत्र लिहिलं आहे. त्यावर आपण कारवाई करीत असालच, अशी मला आशा आहे, असं फडणवीसांनी पत्रात म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“चीनला पाठिंबा देणाऱ्या काश्मिरींना ओमर अब्दुल्लांनी चांगलंच सुनावलं”

“ट्रम्प यांनी चीनला दिला दणका; अडचणीत आणणाऱ्या विधेयकावर केली स्वाक्षरी”

“अर्थमंत्री यांची LIVE पत्रकार परिषद; ‘या’ योजनेबाबत महत्त्वाच्या घोषणा”

काँग्रेस नेते ‘मातोश्री’वर पोहोचले; संजय राऊतही उपस्थित