Home महत्वाच्या बातम्या “अर्थमंत्री यांची LIVE पत्रकार परिषद; ‘या’ योजनेबाबत महत्त्वाच्या घोषणा”

“अर्थमंत्री यांची LIVE पत्रकार परिषद; ‘या’ योजनेबाबत महत्त्वाच्या घोषणा”

नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची महत्त्वाची पत्रकार परिषद आज दिल्लीमध्ये पार पडत आहे.

20 जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गरीब कल्याण योजना लाँच होणार आहे. लॉकडाऊननंतर गावी पोहोचलेल्या मजूरांसाठी ही योजना 20 तारखेपासून सुरू होणार आहे. त्याबाबत आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन पत्रकार परिषदेतून माहिती देत आहेत.

प्रवासी मजुरांसाठी रोजगार उपलब्ध करून देणे हे या योजनेचे उद्दिष्ट असल्याचे यावेळी अर्थमंत्री म्हणाल्या. त्या पुढे म्हणाल्या की बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, ओडिशा आणि राजस्थान या राज्यांमध्ये सर्वाधिक मजूर परतले आहेत. याठिकाणी 116 जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक मजूर आले आहेत. त्यांच्याकरता रोजगार या योजनेतून उपलब्ध करता येईल.

दरम्यान या पत्रकार परिषदेमध्ये अर्थमंत्री भारत चीन संघर्षाबाबत बोलतात का याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

महत्वाच्या घडामोडी-

काँग्रेस नेते ‘मातोश्री’वर पोहोचले; संजय राऊतही उपस्थित

“काँग्रेसच्या नाराज मंत्र्यांना अखेर मुख्यमंत्री भेटीची वेळ मिळाली”

मोदीजी सर्जिकल स्ट्राइक करा; माझ्या शहीद पतीचे बलिदान व्यर्थ जायला नको

अपारंपारिक ऊर्जा धोरणाला चालना देण्यासाठी अजित पवारांच्या अध्यक्षतेखालील बैठक; घेतला ‘हा’ मोठा निर्णय