Home महाराष्ट्र विखे पाटलांच्या टीकेला बाळासाहेब थोरात यांचे प्रत्युत्तर; म्हणाले…

विखे पाटलांच्या टीकेला बाळासाहेब थोरात यांचे प्रत्युत्तर; म्हणाले…

मुंबई : मुख्यमंत्र्याच्या सतत पाया पडणारा विरोधी पक्षनेता राज्याने पाहिला आहे. माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी थोरात यांचे नाव न घेता सत्तेसाठी लाचार झालेला प्रदेशाध्यक्ष पाहिला नाही, अशा शब्दांत टीका केली होती. यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनीही जोरदार टोला हाणत प्रत्युत्तर दिले आहे.

काँग्रेसला लाचार म्हणणाऱ्यांनाच हा शब्द योग्य ठरतो, असं म्हणत बाळासाहेब थोरात यांनी विखे पाटील यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.

दरम्यान, आज आम्हाला लाचार म्हणणारे तेव्हा विरोधी पक्षनेते होते. त्यावेळी त्यांनी किती लाचारी केली, सतत कसे तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या पाया पडत होते, हे उभ्या महाराष्ट्राने पाहिले आहे. ती त्यांची लाचारीच होती. त्यामुळे लाचार हा शब्द त्यांनाच योग्य ठरतो. आमचे सरकार योग्य पद्धतीने काम करीत आहे. महाविकास आघाडी मजबूत आहे. असंही बाळासाहेब थोरात म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

आम्ही उद्धव ठाकरेंकडे उद्याचे पंतप्रधान म्हणून पाहतोय- संजय राऊत

“अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी म्हणून शिवसेनेचा जन्म झाला”

…म्हणून आता लपून-छपून बैठका घ्याव्या लागतात; आशिष शेलारांचा मुख्यमंत्र्यांना टोला

… तर भाजपा ठाकरे सरकारला पाठिंबा देईल; ‘या’ भाजपा नेत्याचं मोठं विधान