Home पुणे गोपाळकृष्ण शाळेत ‘एक पुस्तक आनंदाचे ‘ या अनोख्या उपक्रमाचे आयोजन

गोपाळकृष्ण शाळेत ‘एक पुस्तक आनंदाचे ‘ या अनोख्या उपक्रमाचे आयोजन

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी, पुस्तकाचे महत्त्व समजावे, उन्हाळी सुट्टीत मुलांनी अवांतर वाचन करावे याकरिता गोखलेनगर येथील गोपाळकृष्ण प्राथमिक विद्यामंदिर या शाळेत जागतिक पुस्तक दिनानिमित्त ‘एक पुस्तक आनंदाचे’ हा अनोखा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना घरी अवांतर वाचनासाठी पुस्तक वाटप आले.

ही बातमी पण वाचा : “लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांचा मोठा डाव; ‘हा’ बडा नेता करणार राष्ट्रवादीत प्रवेश”

उन्हाळी सुट्टीत विद्यार्थ्यांना खेळाबरोबर वाचनाची गोडी निर्माण व्हावी, त्याचबरोबर ज्ञानात भर पडावी या उद्देश्याने सदर उपक्रम घेण्यात आल्याचे मुख्याध्यापिका जयश्री कासार यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, सदर उपक्रमाची संकल्पना रणजित बोत्रे यांची होती. यावेळी गीतांजली कांबळे, मंदाकिनी बलकवडे,दिपाली गावडे, विशाल चव्हाण उपस्थित होते.

महत्त्वाच्या बातम्या –

“काँग्रेस पक्षाला मोठं खिंडार, ‘या’ माजी मंत्र्याचा पुत्र भाजपमध्ये”

लोकसभा निवडणूक! पहिल्या टप्प्यातील मतदानाला प्रारंभ, विदर्भातील 5 जागांचा समावेश

उद्धव ठाकरेंचा मनसेला आणि भाजपचा मोठा धक्का