Home महाराष्ट्र …म्हणून आता लपून-छपून बैठका घ्याव्या लागतात; आशिष शेलारांचा मुख्यमंत्र्यांना टोला

…म्हणून आता लपून-छपून बैठका घ्याव्या लागतात; आशिष शेलारांचा मुख्यमंत्र्यांना टोला

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी याबाबत घेतलेल्या बैठकीत पारंपरिक अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाचा पुनरुच्चार केला. यावरुन भाजप नेते आशिष शेलार यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

आदी घोषणा आणि मग होमवर्क.. म्हणून आता लपून-छपून बैठका घ्याव्या लागतात. वारंवार “परिक्षा रद्द” एवढेच जाहीर होतेय. पण ATKT असलेल्यांबद्दल निर्णयाचे काय?, निर्णय कधी याबाबत प्रसिद्धी माध्यमांना कुठलीच सूत्र माहिती देत नाहीत. दिवसागणिक विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थता वाढतेय, असं  आशिष शेलार म्हणाले.

पदवी परिक्षा रद्द मग व्यवसायिक अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांचे काय? तेही महाराष्ट्राचेच तरुण आहेत ना? मग त्यांना का वाऱ्यावर सोडताय? ATKT असलेल्यांशी सापत्न का वागताय? एकसंघ निर्णय घ्या, असंही आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, या तर महाराष्ट्र सरकारच्या पळ काढू आणि वेळ काढू भूमिका, असं म्हणत त्यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे

महत्वाच्या घडामोडी-

… तर भाजपा ठाकरे सरकारला पाठिंबा देईल; ‘या’ भाजपा नेत्याचं मोठं विधान

“शिवसेनेचा 54 वा वर्धापन दिन; उद्धव ठाकरे पक्षाची पुढील वाटचाल सांगणार”

लातूर जिल्हा परिषदेच्या प्रांगणात विलासरावांच्या बाजूला गोपीनाथरावांचं स्मारक उभारणार

कोल्हापूर सांगलीत पूर परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून…; देवेंद्र फडणवीसांच मुख्यमंत्र्यांना पत्र