Home महाराष्ट्र “अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी म्हणून शिवसेनेचा जन्म झाला”

“अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी म्हणून शिवसेनेचा जन्म झाला”

मुंबई : अन्याय सहन करू नका आणि अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी म्हणून शिवसेनेचा जन्म झाला. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची परंपरा मी पुढे घेऊन जात आहे. शिवसेना हेच एक वादळ आहे आम्हाला वादळाची परवा नाही,” असं म्हणत शिवसेनेच्या 54 व्या वर्धापन दिनानिमित्त उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. त्या वेळी ते बोलत होते.

शिवसेनाप्रमुख म्हणायचे की, माझ्याभोवती हे शिवसैनिकांचं कवच आहे. शिवसैनिकांचं कवच पण आहे तसंच त्यांचा वचकसुद्धा आहे. आपल्या सोबत राजकारण करण्याचा जो प्रयत्न झाला ते मोडीत काढायचे त्यामुळे मी आज येथे मुख्यमंत्री म्हणून बसलो आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

दरम्यान, विश्वास ठेवणे ही आमचा कमकुवतपणा नाही, ती आमची संस्कृती आहे. ‘प्राण जाय पर वचन न जाये’ ही आमची संस्कृती आहे. ही लाचार होणारी शिवसेना नाही आणि तुमचा शिवसेना पक्ष प्रमुख सुद्धा लाचार होणार नाही, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

…म्हणून आता लपून-छपून बैठका घ्याव्या लागतात; आशिष शेलारांचा मुख्यमंत्र्यांना टोला

… तर भाजपा ठाकरे सरकारला पाठिंबा देईल; ‘या’ भाजपा नेत्याचं मोठं विधान

“शिवसेनेचा 54 वा वर्धापन दिन; उद्धव ठाकरे पक्षाची पुढील वाटचाल सांगणार”

लातूर जिल्हा परिषदेच्या प्रांगणात विलासरावांच्या बाजूला गोपीनाथरावांचं स्मारक उभारणार