Home महाराष्ट्र …अन्यथा मातोश्रीवर दिवाळी साजरी होऊ देणार नाही; नवनीत राणांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना...

…अन्यथा मातोश्रीवर दिवाळी साजरी होऊ देणार नाही; नवनीत राणांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना इशारा

अमरावती : राज्यातील अनेक शेतकऱ्यांना पूर आणि अतिवृष्टीचा फटका बसल्यामुळे राज्य सरकारने 10 हजार कोटी रुपयांची मदत जाहीर केली. यावरून अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

यंदा पाऊस जास्त झाल्याने शेतकऱ्यांचं नगदी पीक असणारं सोयाबीनचं पीक हातातून गेलंय. त्याचप्रमाणे कपाशीचे पीकसुद्धा वाया गेलंय. त्यामुळे राज्य सरकारने शेतकऱ्यांना सरसकट मदत जाहीर करावी., असं नवनीत राणा यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, दिवाळीच्या अगोदर या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हेक्टरी 50 हजार रुपये मदत मुख्यमंत्र्यांनी जमा केली पाहिजे. जेणेकरून या मदतीमुळे शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाणार नाही. अन्यथा मातोश्रीवर दिवाळी साजरी होऊ देणार नाही., असं म्हणत नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना इशारा दिला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

अर्णब गोस्वामीवरील कारवाई पोलिसांकडून; राज्य सरकारचा यात काहीही संबंध नाही- संजय राऊत

“रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक”

डेव्हिड वाॅर्नर-वृद्धिमान साहाची नाबाद शतकी पार्टनरशिप; हैदराबादचा मुंबईवर 10 विकेट्सनी विजय

सनरायझर्स हैदराबादने टाॅस जिंकला; प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय