Home महाराष्ट्र “उद्धव ठाकरेंना भविष्यात युती तोडल्याचा पश्चाताप करावा लागेल”

“उद्धव ठाकरेंना भविष्यात युती तोडल्याचा पश्चाताप करावा लागेल”

उस्मानाबाद : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना युती तोडल्याचा पश्चाताप होईल, असं म्हणत माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. ते भाजपच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलत होते.

आगामी काळात महाराष्ट्राची जनता शिवसेनेला चांगलाच झटका देईल. तसच उद्धव ठाकरे यांना भविष्यात युती तोडल्याचा पश्चाताप करावा लागेल, असं देशमुख यांनी म्हटलं आहे.

गेल्या पाच वर्षात भाजपने जनहिताची अनेक कामे केली. तसेच राज्याच्या विकासाकडे लक्ष दिलं. त्यामुळे जनतेने भाजप-सेनेच्या युतीला बहुमत दिलं होतं. पण, शिवसेनेनं विश्वासघात करत महाविकास आघाडीशी सलगी केली, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळला नाही. तसच त्यांनी सामान्य नागरिक आणि शेतकरी यांची दिशाभूल केली आहे, असंही सुभाष देशमुख म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

नवाब मलिकांचा भाजपला मोलाचा सल्ला; म्हणतात…

“चंद्रकांतदादा ती केवळ चूक नव्हती, तर ‘मेगाचूक’ होती”

“शिवसेना कधीही दिल्लीसमोर झुकणार नाही”

मेगाभरतीमुळे भाजपची संस्कृती बिघडली- चंद्रकांत पाटील