Home महाराष्ट्र  “चंद्रकांतदादा ती केवळ चूक नव्हती, तर ‘मेगाचूक’ होती”

 “चंद्रकांतदादा ती केवळ चूक नव्हती, तर ‘मेगाचूक’ होती”

मुंबई : चंद्रकांतदादा, ती केवळ चूक नव्हती, तर ‘मेगाचूक’ होती, असं म्हणत काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे.

भाजपने नेत्यांची मेगाभरती करण्याऐवजी महाराष्ट्रातील तरूणांसाठी रोजगाराची मेगाभरती केली असती तर ते राज्याच्या अधिक हिताचे ठरले असते. त्यामुळे चंद्रकांतदादा, ती केवळ चूक नव्हती, तर ‘मेगाचूक’ होती, असं अशोक चव्हाण म्हणाले.

 दरम्यान, विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये झालेल्या मेगाभरतीमुळे भाजपची संस्कृती बिघडली आहे, असं भाजपचे प्रदेशाध्य चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं होतं. त्यावर आता काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी हे वक्तव्य केलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“शिवसेना कधीही दिल्लीसमोर झुकणार नाही”

मेगाभरतीमुळे भाजपची संस्कृती बिघडली- चंद्रकांत पाटील

उदयनराजेंकडून छत्रपती शिवरायांचे वंशज असल्याचे पुरावे मागणारे मोघलांची आवलाद; भाजपचा हल्लाबोल

…तर भाजपा शिवरायांच्या वंशजांची माफी मागेल काय? संजय राऊतांचा भाजपला सवाल