Home महाराष्ट्र “शिवसेना कधीही दिल्लीसमोर झुकणार नाही”

“शिवसेना कधीही दिल्लीसमोर झुकणार नाही”

सांगली : शिवसेना कधीही दिल्लीसमोर झुकणार नाही. शिवसेना सोबत होती म्हणून भाजपचे खासदार निवडून आले आहेत, असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. ते सांगलीमधील एका कार्यक्रमात बोलत  होते.

केंद्र सरकार राज्याचं पालक असलं पाहिजे. मात्र केंद्र सरकार मदत देताना दुजाभाव करत नकारघंटा  वाजवणार असेल तर शिवसेना कधीही दिल्लीसमोर झुकणार नाही, असं उद्धव ठाकरे  म्हणाले.

काळजी करू नका सरकार बदललं आहे. आमचं सरकार हे सूड उगवणारं सरकार नाही. आधीच्या सरकारने जे चांगलं केलं ते सुरू ठेवणार आहे, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, आमचा संघ चांगलाच उत्तम आहे. संघ म्हणजे टीम जाऊद्या नको तो वाद, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघोवरही टिकास्त्र सोडलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

मेगाभरतीमुळे भाजपची संस्कृती बिघडली- चंद्रकांत पाटील

उदयनराजेंकडून छत्रपती शिवरायांचे वंशज असल्याचे पुरावे मागणारे मोघलांची आवलाद; भाजपचा हल्लाबोल

…तर भाजपा शिवरायांच्या वंशजांची माफी मागेल काय? संजय राऊतांचा भाजपला सवाल

मला जाणता राजा म्हणा असं मी कुठेच म्हणालो नाही- शरद पवार