Home महाराष्ट्र मला जाणता राजा म्हणा असं मी कुठेच म्हणालो नाही- शरद पवार

मला जाणता राजा म्हणा असं मी कुठेच म्हणालो नाही- शरद पवार

सातारा : भाजपने ‘आज के शिवाजी, नरेंद्र मोदी’ हे पुस्तक प्रकाशित केलं. सोशल मीडियावर या पुस्तकाविरोधात जोरदार संताप व्यक्त केला गेला. त्यावर  शरद पवारांना महाराष्ट्राचा जाणता राजा असं म्हणणं चालतं का? असा सवाल भाजपने केला होता. यावर शरद पवारांनी अखेर मौन सोडलंय.

मी तरी कोणाला कांही बोललो नाही. मला जाणता राजा म्हणा असं मी कुठेच कुणाला म्हणालो नाही, असं शरद पवारांनी स्पष्ट केलं आहे. ते सातारा इथं झालेल्या जाहीर सभेत बोलत होते.

जाणता राजा हा शब्द रामदास यांनी आणला. शिवचरित्राचा व्यवस्थित अभ्यास केल्यास जाणता राजा ही उपाधी शिवाजी महाराजांना कधीच लावण्यात आली नव्हती, असंही शरद पवारांनी म्हटलं आहे

दरम्यान, रामदास हे शिवाजी महाराज यांचे गुरु नव्हते तर राजामाता जिजाऊ या त्यांच्या गुरू होत्या. शिवाजी महाराजांचे गुरु रामदास होते ही लेखणीची कमाल. लेखणीची छत्रपती ही शिवाजी महाराजांची खरी उपाधी आहे. असं शरद पवार म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

उदयनराजेंनी शिवरायांचे वंशज असल्याचे पुरावे द्यावे; संजय राऊतांच वादग्रस्त वक्तव्य

“उदयनराजेंनी पत्रकार परिषदेत सरळ शब्दात उद्धवची आणि संज्याची औकात काढल्याबद्दल त्यांच अभिनंदन”

“मुलाच नाव शिवाजी ठेवलं तर एनओसी साताऱ्यातून मागवायची का?”

शिवसेना पक्षला जेव्हा नाव दिलं तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांना विचारलं होतं का?