Home पुणे शिवसेना पक्षला जेव्हा नाव दिलं तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांना विचारलं होतं...

शिवसेना पक्षला जेव्हा नाव दिलं तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांना विचारलं होतं का?

पुणे : भाजपने ‘आज के शिवाजी, नरेंद्र मोदी’ हे पुस्तक प्रकाशित केलं. सोशल मीडियावर या पुस्तकाविरोधात जोरदार संताप व्यक्त केला जात आहे. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी ट्विट करत शिवरायांचे वंशज कुठे आहेत? असा सवाल केला होता. भाजपमधून राजीनामा द्यायला पाहिजे, अशीही राऊत यांनी मागणी केली होती. त्या टीकेला भाजप नेते आणि माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रतृत्तर दिलं आहे.

शिवसेना पक्षला जेव्हा नाव दिलं तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांना विचारलं होतं का?, असा सवाल उदयनराजे भोसले यांनी शिवसेनेला केला आहे.

गोयल नावाच्या लेखकाने मोदींची तुलना छत्रपती शिवरायांशी केली, महाराष्ट्रात जाऊ द्या, जगात शिवरायांशी कोणाची तुलना होऊ शकत नाही, असं उदयनराजे भोसले यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, जाणता राजा म्हणून अलिकडे उपमा दिल्या जातात, मात्र जाणता राजा फक्त आणि फक्त शिवाजी राजा आहे, असं म्हणत उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्यावर टिकास्त्र सोडलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिला एकदिवसीय सामना; ऑस्ट्रेलियाचा टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय

“सावरकर आणि गोडसेंबाबत अपशब्द वापरण्यात आले त्यावेळी संजय राऊतांची बोलती बंद का होती?”

शिवसेना भवनात बाळासाहेबांना शिवाजी महाराजांच्या वरचे स्थान आहे का? निलेश राणेंचा राऊतांना सवाल

“…तर मी पुस्तक मागे घ्यायला तयार आहे”