Home महाराष्ट्र नवाब मलिकांचा भाजपला मोलाचा सल्ला; म्हणतात…

नवाब मलिकांचा भाजपला मोलाचा सल्ला; म्हणतात…

मुंबई  : भाजपने ज्यांना पक्षात स्थान दिलं  त्यांना बाहेरचा रस्ता दाखवावा आणि आपली चूक सुधारावी, असं म्हणत राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी भाजपला खोचक असा सल्ला दिला आहे.

जे नेते तुम्ही आयात केले आहेत आणि जे आमदार, खासदार झाले आहेत त्यांना आता पक्षातून काढून चूक सुधारण्याचा प्रयत्न करा, असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

चंद्रकांत पाटील यांनी केलेले विधान गांभीर्याने घेणे गरजेचे आहे. भाजपने पक्षवाढीसाठी हौशे-नौशे-गौशे घेतले आणि ज्यांना समाजाने फेकून इतर राजकीय पक्षांनी ज्यांना काढून टाकले होते, अशा लोकांना भाजपने आपल्या पक्षात घेतल्यामुळे जे निष्ठावान कार्यकर्ते होते त्यांना निवडणुकीपासून दूर ठेवलं गेलं. त्याचा परिणाम भाजपला भेगावा लागला, असंही मलिक म्हणाले.

दरम्यान, भाजपची ही मेगाभरती चूक असल्याचं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. यावर नवाब मलिक यांनी भाजपला हा सल्ला दिला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“चंद्रकांतदादा ती केवळ चूक नव्हती, तर ‘मेगाचूक’ होती”

“शिवसेना कधीही दिल्लीसमोर झुकणार नाही”

मेगाभरतीमुळे भाजपची संस्कृती बिघडली- चंद्रकांत पाटील

उदयनराजेंकडून छत्रपती शिवरायांचे वंशज असल्याचे पुरावे मागणारे मोघलांची आवलाद; भाजपचा हल्लाबोल