Home नाशिक आम्ही भाजपसोबत आहोत, मात्र…; महादेव जानकर यांचा भाजपला गंभीर इशारा

आम्ही भाजपसोबत आहोत, मात्र…; महादेव जानकर यांचा भाजपला गंभीर इशारा


आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नाशिक : शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार मागच्या वर्षभरापासून रखडलेला आहे. हा मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होणार असल्याचं सत्ताधारी पक्षाकडून सांगण्यात येत आहे. अशातच रासप पक्षाकडूनही या मंत्रिमंडळ विस्तारात कॅबिनेट मंत्रिपद मिळण्याची अपेक्षा बोलून दाखवण्यात आली आहे.

आम्ही भाजपसोबत आहे. आम्हाला विधानसभेला, लोकसभेला जागा मिळाली नाही. आम्ही बंडखोरी करून शेवटी आमचा आमदार निवडून आणला. शाहू, फुले, आंबेडकर यांचे विचार सांगणाऱ्या काँग्रेस, राष्ट्रवादीने आम्हाला सोबत घेतलं नाही, असं जानकर म्हणाले आहेत.

ही बातमी पण वाचा : विरोधी पक्षनेतेपद का नकोय?; अखेर अजित पवारांनी सांगितलं नेमकं कारण, म्हणाले, अरे बाबा…

भाजप जगातला सर्वात मोठा पक्ष आहे, त्यांना सल्ला देण्याइतपत मी मोठा नाही. त्यांच्यावर आम्ही नाराज नाही, राग देखील नाही. मी स्वतःला सांगतो, की महादेव जानकर स्वतःला मोठा कर…. त्यावेळी मीडिया देखील मागे येईल, असं जानकर यांनी यावेळी सांगितलं.

आम्ही NDA मध्ये आहोत. पण आम्हाला लोकसभेला जागा मिळाली नाही. मी स्वतःच्या हिंमतीवर पक्ष चालवतो. आम्ही म्हणतो NDA मध्ये आहे. पण ते जाहीरपणे म्हणत नाही. ज्यावेळी माझे 50 आमदार असतील, त्यावेळी मी बोलेल, असंही महादेव जानकर म्हणालेत.

महत्त्वाच्या घडामोडी –

“एकनाथ खडसेंची घेतलेली भेट यशस्वी ठरली?; पंकजा मुंडे राष्ट्रवादीत येणार?; ‘या’ मोठ्या नेत्याच्या विधानाने खळबळ”

“पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीला, मोठा धक्का, ‘हा’ मोठा नेता पक्षातून बाहेर पडणार”

“विदर्भात मनसेला धक्का, ‘हा’ मोठा नेता उद्या, फडणवीसांच्या उपस्थितीत भाजपचं कमळ हाती घेणार”