Home नागपूर “विदर्भात मनसेला धक्का, ‘हा’ मोठा नेता उद्या, फडणवीसांच्या उपस्थितीत भाजपचं कमळ हाती...

“विदर्भात मनसेला धक्का, ‘हा’ मोठा नेता उद्या, फडणवीसांच्या उपस्थितीत भाजपचं कमळ हाती घेणार”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

चंद्रपूर : आगामी निवडणूकीसाठी भाजपनं जोरदार कंबर कसली असून गेल्या काही दिवसांपासून पक्षात जोरदार इनकमिंग सूरू आहे. अशातच आता चंद्रपूरमध्ये भाजपने मनसेला मोठा धक्का दिला आहे.

मनसेचे मोठे नेते म्हणून ओळख असलेले रमेश राजूरकर हे उद्या भाजपचा झेंडा हाती घेणार आहेत. राजूरकर उद्या, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये भाजपचं कमळ हाती घेणार आहेत. भद्रावती येथील जैन मंदिर सभागृहामध्ये पक्ष प्रवेशाच्या मोठ्या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

दरम्यान, रमेश राजूरकर हे मनसेचे मोठे नेते समजले जात होते. मात्र तेच आता भाजपमध्ये जाणार असल्याने मनसेला मोठा धक्का बसणार आहे.

महत्त्वाच्या घडामोडी –

“कॅप्टून कूलचं पुन्हा टीम इंडियात पुनरागमन?; राहुल द्रविडची सुट्टी, तर धोनी होणार नवा प्रशिक्षक?”

“संजय राऊत यांचं मानसिक संतुलन बिघडलंय, त्यामुळे…”

“पांडूरंगाची यंदाची महापूजा ही एकनाथ शिंदे यांची राजकारणातील अखेरची महापूजा ठरेल”