Home महाराष्ट्र “पांडूरंगाची यंदाची महापूजा ही एकनाथ शिंदे यांची राजकारणातील अखेरची महापूजा ठरेल”

“पांडूरंगाची यंदाची महापूजा ही एकनाथ शिंदे यांची राजकारणातील अखेरची महापूजा ठरेल”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : पंढरीच्या पांडूरंगाची यंदाची महापूजा ही एकनाथ शिंदे यांच्या राजकारणातील अखेरची महापूजा ठरेल, असं मोठं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी केलं आहे.

पुढच्या वर्षी अजित पवार मुख्यमंत्री म्हणून पंढरीच्या पांडूरंगाची महापूजा करतील. यंदाची महापूजा ही एकनाथ शिंदे यांच्या राजकारणातील अखेरची महापूजा ठरेल, असं अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे. एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना मिटकरींनी ही प्रतिक्रिया दिली.

ही बातमी पण वाचा : “राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, प्रदेशाध्यक्ष बदलणार?; ‘या’ नेत्याच्या विधानानं चर्चांना उधाण”

अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घुसमट होत आहे. अजित पवार काही दिवसांत उठाव करतील, असं मोठं वक्तव्य शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी केलं होतं. त्याला प्रत्युत्तर देत अमोल मिटकरी यांनी हे वक्तव्य केलं आहे.

दरम्यान, मिटकरींच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात तर्क वितर्क लावले जात आहेत.

महत्त्वाच्या घडामोडी –

“मुंबईनंतर आता सांगलीतही ईडीचं धाडसत्र सुरू, 14 तासानंतरही ईडीचं ऑपरेशन सूरूच”

पुढच्या वर्षी अजित पवार मुख्यमंत्री म्हणून…; राष्ट्रवादी नेत्याचं वक्तव्य चर्चेत

मोठी बातमी! माजी महापौर किशोरी पेडणेकर ईडीच्या रडारवर