Home महाराष्ट्र “मुंबईनंतर आता सांगलीतही ईडीचं धाडसत्र सुरू, 14 तासानंतरही ईडीचं ऑपरेशन सूरूच”

“मुंबईनंतर आता सांगलीतही ईडीचं धाडसत्र सुरू, 14 तासानंतरही ईडीचं ऑपरेशन सूरूच”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

सांगली : मुंबईतल्या ईडीचं धाडसत्र आता सांगलीमध्येही पोहोचलं आहे. सांगली शहरातील इलेक्ट्रिकल व्यावसायिक पारेख बंधू आणि निकटवर्तीयांसह दोन व्यापाऱ्यांवर आज ईडीच्या पथकांनी धाडी टाकल्या.

छाप्याचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नाही, मात्र सकाळी सकाळी झालेल्या या छापेमारीनं व्यापारी वर्गात जोरदार खळबळ उडाली आहे.

ही बातमी पण वाचा : पुढच्या वर्षी अजित पवार मुख्यमंत्री म्हणून…; राष्ट्रवादी नेत्याचं वक्तव्य चर्चेत

14 तास उलटले असून अजूनही कारवाई सूरूच आहे. तसेच यावेळी ईडीच्या अधिकाऱ्यांनी महत्त्वाची कागदपत्रे, बँक खात्यांची माहिती ताब्यात घेतली असल्याचं समजत आहे.

दरम्यान, आज पहाटे 11 वाहनांमधून 60 अधिकारी या कारवाईसाठी सांगलीत दाखल झाले होते. दक्षिण शिवाजीनगरमधील सुरेश पारेख आणि दिनेश पारेख यांच्या बंगल्यावर त्यांनी छापे घातले. या पथकासोबत आलेल्या सीआरपीएफच्या जवानांचा बंगल्यासमोर बंदोबस्त ठेवण्यात आला.

महत्त्वाच्या घडामोडी –

मोठी बातमी! माजी महापौर किशोरी पेडणेकर ईडीच्या रडारवर

“अजित पवारांना, शिंदे गटात घेण्यासंदर्भात उदय सामंत यांचं मोठं विधान, म्हणाले, शिवसेनेत कुणाला घ्यायचं हे…”

“ठाकरेंचा मोठा डाव, शिंदे गटात प्रवेश केलेल्या मनिषा कायंदेंना अपात्र ठरविण्यासाठी उचलणार ‘हे’ मोठं पाऊल”