Home महाराष्ट्र “राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, प्रदेशाध्यक्ष बदलणार?; ‘या’ नेत्याच्या विधानानं चर्चांना उधाण”

“राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, प्रदेशाध्यक्ष बदलणार?; ‘या’ नेत्याच्या विधानानं चर्चांना उधाण”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या प्रचंड वेगाने घडामोडी घडत आहेत. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी खासदार सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांना पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी दिली. त्यानंतर आता पक्षात आणखी काही बदल होण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादीची 28 जूनला राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक पार पडणार आहे. शरद पवार यांच्या उपस्थितीत दिल्लीत ही बैठक होणार आहे. पक्षातील विविध संघटनात्मक बदलाबाबत या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.

ही बातमी पण वाचा : “मुंबईनंतर आता सांगलीतही ईडीचं धाडसत्र सुरू, 14 तासानंतरही ईडीचं ऑपरेशन सूरूच”

काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी, आपल्याला विरोधी पक्षनेते पदाच्या जबाबदारीतून मुक्त करा आणि पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसाठी जबाबदारी द्या, अशी मागणी केली. तसेच यावेळी त्यांनी जयंत पाटील यांना प्रदेशाध्यक्ष होऊन 5 वर्ष 1 महिन्याचा कालावधी उलटला आहे, असंही म्हटलं. वास्तव्यात घटनेनुसार, तीन वर्षांनी पक्षाचा प्रदेशाध्यक्ष बदलणं अपेक्षित असतं. त्यामुळे आगामी काळात राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी इतर नेत्याकडे जाऊ शकते.

दरम्यान, अशातच आता राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांनी यांनी ओबीसी समाजाला प्रदेशाध्यक्षपद मिळावं, असं म्हणत प्रदेशाध्यक्ष पदाबाबतची इच्छा व्यक्त केली. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

महत्त्वाच्या घडामोडी –

पुढच्या वर्षी अजित पवार मुख्यमंत्री म्हणून…; राष्ट्रवादी नेत्याचं वक्तव्य चर्चेत

मोठी बातमी! माजी महापौर किशोरी पेडणेकर ईडीच्या रडारवर

“अजित पवारांना, शिंदे गटात घेण्यासंदर्भात उदय सामंत यांचं मोठं विधान, म्हणाले, शिवसेनेत कुणाला घ्यायचं हे…”