Home महाराष्ट्र “एकनाथ खडसेंची घेतलेली भेट यशस्वी ठरली?; पंकजा मुंडे राष्ट्रवादीत येणार?; ‘या’ मोठ्या...

“एकनाथ खडसेंची घेतलेली भेट यशस्वी ठरली?; पंकजा मुंडे राष्ट्रवादीत येणार?; ‘या’ मोठ्या नेत्याच्या विधानाने खळबळ”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना वारंवार पक्षात डावललं जात आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. अशातच बीआरएस म्हणजेच भारत राष्ट्र समिती पक्षाने पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली आहे. यावरून आता राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

पंकजा मुंडे या लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील. याबाबतची माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना माहीत आहे, असं मोठं विधान मिटकरी यांनी यावेळी केलं. ते टी.व्ही. 9 मराठीशी बोलत होते.

ही बातमी पण वाचा : “पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीला, मोठा धक्का, ‘हा’ मोठा नेता पक्षातून बाहेर पडणार”

बीआरएस ही अफूची गोळी आहे. बीआरएस हे नवीन गुलाबी वादळ आहे. बीआरएस किंवा एमआयएमने पंकजा मुंडेंना काय ऑफर द्यावी, हा त्यांचा प्रश्न आहे. पण त्यांच्या ऑफरला पंकजा मुंडे भाळतील आणि बीआरएसच्या गळाला लागलीत, असं मला वाटतं नाही. बीआरएसच्या गळाला जे लागले आहेत, त्यांचं महाराष्ट्रात भविष्य चांगलं नाही. कारण तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी बीआरएसला अद्याप महाराष्ट्रातला चेहरा दिला नाही. त्यामुळे हे गुलाबी वादळ आहे, काही दिवसांत शांत होईल. मात्र पंकजाताई थोड्याच दिवसात त्यांचा पक्ष सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात येतील, हे भाजपामध्ये फक्त चंद्रशेखर बावनकुळेंनाच माहीत आहे, असं मोठं विधान अमोल मिटकरींनी यावेळी केलं.

दरम्यान, मध्यंतरी एकनाथ खडसे यांनी पंकजा मुंडेंची भेट घेतली होती. तेंव्हापासूनच्या घडामोडी तुम्ही बारकाईने पाहत असाल, तर बऱ्याच प्रमाणात भाजपकडून पंकजा मुंडे यांना वारंवार अपमानास्पद वागणूक दिली जात आहे. परवा कारखान्याची निवडणूक झाली, तेंव्हा दोघंही बहीण-भाऊ (पंकजा मुंडे व धनंजय मुंडे) सामंजस्याने एकत्र आले. त्यामुळे आम्हाला विश्वास आहे, पंकजा मुंडे राष्ट्रवादी पक्षात येतील. पंकजा मुंडे या गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या आहेत. त्या महाराष्ट्राचं नेतृत्व आहेत. त्यामुळे त्या आपल्या पक्षात असाव्यात, असं प्रत्येकाला वाटलं. त्यामुळे मलाही वाटतं की, त्या आमच्या पक्षात असाव्यात., असं मिटकरी म्हणाले.

महत्त्वाच्या घडामोडी –

जयंत पाटील राष्ट्रवादी का सोडणार?, भाजपने सांगितली ‘ही’ 10 कारणे

“विदर्भात मनसेला धक्का, ‘हा’ मोठा नेता उद्या, फडणवीसांच्या उपस्थितीत भाजपचं कमळ हाती घेणार”

विरोधी पक्ष कधी…; पाटण्यातल्या बैठकीनंतर मनसेने राज ठाकरेंचा जुना व्हिडीओ केला शेअर