Home महाराष्ट्र विरोधी पक्ष कधी…; पाटण्यातल्या बैठकीनंतर मनसेने राज ठाकरेंचा जुना व्हिडीओ केला शेअर

विरोधी पक्ष कधी…; पाटण्यातल्या बैठकीनंतर मनसेने राज ठाकरेंचा जुना व्हिडीओ केला शेअर

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : काल पाटणा येथे विरोधकांची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला 16 विरोधी पक्षाचे नेते उपस्थित होते. ही बैठक तब्बल ४ तास चालली. विशेष म्हणजे या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली असून सर्व पक्षांनी एकत्र येण्याची तयारी दर्शवली आहे. विरोधकांच्या या बैठकीवर सत्ताधारी भाजपा आणि भाजपाचे इतर मित्रपक्ष वेगवेगळ्या प्रकारची टीका करत आहेत.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष दोन्ही गटांपासून लांब आहे. मात्र याचदरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या जुन्या मुलाखतीचा एक व्हिडीओ मनसेनं सोशल मीडियावर शेअर केला आहे. यात राज ठाकरे विरोधक आणि सत्ताधारी यांच्याबद्दल बोलले होते. ही मुलाखत साडेपाच वर्ष जुनी आहे.

ही बातमी पण वाचा : “संजय राऊत यांचं मानसिक संतुलन बिघडलंय, त्यामुळे…”

कोणाची सत्ता आज येते, कोणाची उद्या जाते, कोणा दुसऱ्याची सत्ता उद्या येते. परंतु ही सत्ता टिकवण्याचा सगळेजण प्रयत्न करत असत. राजकीय पक्ष, मग तो कुठलाही असो, तो पक्ष ती सत्ता टिकवण्याचा प्रयत्न करतो, मला माहितीय त्याप्रमाणे, विरोधी पक्ष हा कधीच जिंकत नसतो. सत्ताधारी हरत असतात. ज्या दिवशी तुमच्या हातात पूर्ण सत्ता येते ती त्या क्षणाला जायची सुरुवात देखील होते. आता सत्ता जायची ही जी गोष्ट आहे ती तुम्ही किती ताणताय एवढच तुमच्या हातात असतं, म्हणजेच ती सत्ता किती पुढे नेताय हेच तुमच्या हातात असतं, असं राज ठाकरे या व्हिडिओमध्ये म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या घडामोडी –

“पांडूरंगाची यंदाची महापूजा ही एकनाथ शिंदे यांची राजकारणातील अखेरची महापूजा ठरेल”

“राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, प्रदेशाध्यक्ष बदलणार?; ‘या’ नेत्याच्या विधानानं चर्चांना उधाण”

“मुंबईनंतर आता सांगलीतही ईडीचं धाडसत्र सुरू, 14 तासानंतरही ईडीचं ऑपरेशन सूरूच”