Home महाराष्ट्र उदयनराजेंनी चक्क तोंडाने कार्यकर्त्याला भरवला पेढा; व्हिडीओ होतोय चांगलाच व्हायरल

उदयनराजेंनी चक्क तोंडाने कार्यकर्त्याला भरवला पेढा; व्हिडीओ होतोय चांगलाच व्हायरल

273

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम

सातारा : खासदार उदयनराजे भोसले हे नेहमीच त्यांच्या शैलीत कॉलर उडविणे तर कधी दुचाकीवर फिरणे या  अंदाजामुळे चर्चेत असतात. आता उदयनराजेंची आणखी एक कृती सध्या चर्चेत आहे.

हे ही वाचा : एकनाथ शिंदेंचा मनसेला धक्का; मनसेचा ‘या’ मोठ्या नेत्याचा शिंदे गटात जाहीर प्रवेश

साताऱ्यामधील एका सार्वजनिक कार्यक्रमात उदयनराजेंनी कार्यकर्त्याला चक्क तोंडाने पेढा भरवला. खासदार उदयनराजे भोसले यांनी ज्याला पेढा भरवला त्याचे नाव विनोद मोरे असं असून साताऱ्यातील गोडोली येथे विनोद मोरे  यांच्या वाढदिवसाचा कार्यक्रम होता. त्यांचे कौतुक करण्यासाठी उदयनराजेंनी त्यांना चक्क तोंडाने पेढा भरवला. उदयनराजेंचा हा व्हिडीओ समाजमाध्यमांवर चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे.

दरम्यान, नेत्याचे असे प्रेम पाहून असंख्य कार्यकर्ते त्यांच्यावर फिदा झाले आहेत. सामान्य लोकांकडून उदयनराजे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतो.

महत्त्वाच्या  घडामोडी –

50 खोके एकदम ओके, सरकारचा धिक्कार असो; विरोधकांची आक्रमक घोषणाबाजी

सरकारने लोकशाहीच्या चिंधड्या उडवल्या; पावसाळी अधिवेशनावरून अजित पवारांचा घणाघात

रोटरॅक्ट क्लब कृष्णा व्हॅलीच्या 150 सदस्यांनी साकारला मानवी तिरंगा