Home क्रीडा वृद्धिमान साहा-जेसन होल्डरची शानदार फलंदाजी; हैदराबादची बेंगलोरवर 5 विकेट्सनी मात

वृद्धिमान साहा-जेसन होल्डरची शानदार फलंदाजी; हैदराबादची बेंगलोरवर 5 विकेट्सनी मात

दुबई : आजच्या आयपीएलच्या राॅयल चैलेंजर्स बेंगलोर विरूद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने राॅयल चैलेंजर्स बेंगलोरचा 5 विकेट्सनी पराभव केला.

या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने टाॅस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. राॅयल चैलेंजर्स बेंगलोरने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 गडी गमावत केवळ 120 धावा केल्या. बेंगलोरकडून जोश फिलिपने 31 चेंडूत 32 धावा, ए.बी.डिव्हीलियर्सने 24 चेंडूत 24 धावा, वाॅशिंग्टन सुंदरने 18 चेंडूत 21 धावा केल्या. तर हैदराबादने संदीप शर्मा व जेसन होल्डरने 2, तर टी.नटराजन, शाहबाज नदीम व राशिद खानने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

धावांचा पाठलाग करताना हैदराबादने हे लक्ष्य 14.1 षटकात 5 विकेट गमावत पूर्ण केले. हैदराबादकडून वृद्धिमान साहाने सर्वाधिक 32 चेंडूत 39 धावा केल्या. तर तर मनीष पांडेने 19 चेंडूत 26 धावा, जेसन होल्डरने 10 चेंडूत नाबाद 26 धावा केल्या. बेंगलोरकडून युझवेंद्र चहलने 2, तर वाॅशिंग्टन सुंदर, नवदीप सैनी व इसुरू उडाणाने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

महत्वाच्या घडामोडी-

“जेम्स बाँडची भूमिका साकारलेले हाॅलिवूड अभिनेते सीन काॅनेरी काळाच्या पडद्याआड”

सनरायझर्स हैदराबादने टाॅस जिंकला; प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय

ईशान किशनची नाबाद मॅचविनिंग खेळी; मुंबई इंडियन्सची दिल्ली कॅपिटल्सवर 9 विकेट्सनी मात

हिंमत असेल तर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने वेगवेगळं लढावं- चंद्रकांत पाटील