Home क्रीडा ईशान किशनची नाबाद मॅचविनिंग खेळी; मुंबई इंडियन्सची दिल्ली कॅपिटल्सवर 9 विकेट्सनी मात

ईशान किशनची नाबाद मॅचविनिंग खेळी; मुंबई इंडियन्सची दिल्ली कॅपिटल्सवर 9 विकेट्सनी मात

दुबई : आजच्या आयपीएलच्या दिल्ली कॅपिटल्स विरूद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा 9 विकेट्सनी पराभव केला.

आजच्या सामन्यात मुंबई इंडियन्सने टाॅस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 9 गडी गमावत केवळ 110 धावाच केल्या. दिल्लीकडून कर्णधार श्रेयस अय्यरने सर्वाधिक 29 चेंडूत 25 धावा केल्या. तर रिषभ पंतने 24 चेंडूत 21 धावा केल्या. तर मुंबईकडून जसप्रित बुमरा व ट्रेंट बोल्टने प्रत्येकी 3, तर नॅथन कुल्टर नाईल व राहूल चहरने 1 विकेट घेतली.

धावांचा पाठलाग करताना मुंबईने हे लक्ष्य केवळ 1 विकेट गमावत केवळ 14.2 षटकात पूर्ण केले. मुंबईकडून ईशान किशनने नाबाद 47 चेंडूत 72 धावांची धमाकेदार खेळी केली. तर क्विंटन डीकाॅकने 28 चेंडूत 26 धावा केल्या. तर दिल्लीकडून नाॅर्त्झने 1 विकेट घेतली.

महत्वाच्या घडामोडी-

हिंमत असेल तर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने वेगवेगळं लढावं- चंद्रकांत पाटील

ट्रेंट बोल्ट-जसप्रित बुमराची घातक गोलंदाजी; मुंबईने दिल्लीला 110 धावांत रोखलं

“अशोक चव्हाण जे बोलतात त्याच्याशी मुख्यमंत्र्यांचा थेट संबंध नाही”

पंकजा मुंडे शिवसेनेत येणार का?; यावर संजय राऊत म्हणाले….