Home नांदेड “मनसेत सुसाट इनकमिंग; नांदेडमध्ये विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांनी हाती धरला मनसेचा भगवा”

“मनसेत सुसाट इनकमिंग; नांदेडमध्ये विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांनी हाती धरला मनसेचा भगवा”

798

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नांदेड : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मनसेनं कंबर जोरदार कसली असून पक्षात गेल्या काही दिवसांपासून जोरदार इनकमिंग सूरू आहे. अशातच आता नांदेडमधील अनेकांनी मनसेचा भगवा झेंडा हाती घेतला.

नांदेड जिल्ह्यातील मुखेड येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांची बैठक शासकीय विश्रामगृह येथे मनसे नेते श्री. दिलीपबापू धोत्रे, प्रदेश सरचिटणीस श्री. संतोष नागरगोजे यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. यावेळी विविध पक्षांतील कार्यकर्त्यांनी मनसेत प्रवेश केला.

हे ही वाचा : “राज्यपालांनी हे सरकार बरखास्त करावं, भाजपनंतर आता संभाजी भिडे आक्रमक”

दरम्यान, जिल्हाध्यक्ष श्री. मोंटीसिंग जहागीरदार, मुखेड तालुका अध्यक्ष श्री. संतोष बनसोडे, नगरसेवक श्री. विनोद अडेपवार, विद्यार्थी सेना जिल्हा अध्यक्ष श्री. सुभाष भंडारे, श्री. सुशील देशमुख, श्री. राजकुमार भिल्लाडे, श्री. आदिप पठाण, श्री. भाऊसाहेब गायकवाड, श्री. गजानन मामेलवड, श्री. अभय टीवलीकर इत्यादी उपस्थित होते.

महत्वाच्या घडामोडी –

राष्ट्रवादीत इनकमिंग सुरूच; ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीनं अजित दादांच्या उपस्थितीत हाती बांधलं घड्याळ

मोठी बातमी! अखेर भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन रद्द, सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

“भाजप नेते गिरीश महाजन यांच्यासह 11 जणांविरोधात गुन्हा दाखल”