Home जळगाव “भाजप नेते गिरीश महाजन यांच्यासह 11 जणांविरोधात गुन्हा दाखल”

“भाजप नेते गिरीश महाजन यांच्यासह 11 जणांविरोधात गुन्हा दाखल”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

जळगाव : जळगावमध्ये भाजप नेते गिरीश महाजन यांच्या नेतृत्वात महावितरणावर मोर्चा काढण्यात आला. मात्र जमावबंदीच्या आदेशांचं उल्लंघन केल्याप्रकरणी गिरीश महाजन यांच्यासह 11 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात जमावबंदी लागू करण्यात आली होती. त्यानुसार 5 पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा आधीच दिला होता. याच पार्श्वभूमीवर जमावबंदीचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र ही जमावबंदी झुगारत मोर्चा काढल्यानं गिरीश महाजनांसह 11 जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

हे ही वाचा : “औरंगाबादेत शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या उद्घाटनावरून मराठा क्रांती मोर्चा, एमआयएम आक्रमक; केली ‘ही’ मोठी मागणी”

दरम्यान, महावितरण मोठ्या तोट्यात आहे, त्यामुळे वीजबिलं भरा असं आवाहन उर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडून वारंवार करण्यात येत आहे. तसेच ज्यांची बिलं थकली आहेत त्यांची वीज कनेक्शन कापण्यात येत आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचं ऐन हंगामात मोठं नुकसान होत आहे. याच पार्श्वभूमीवर गिरीश महाजन यांनी महावितरणावर मोर्चा काढला होता.

महत्वाच्या घडामोडी –

सत्तेसाठी भाजपाची मदत घेणाऱ्या शिवसेनेने आम्हाला निष्ठा शिकवू नये; राष्ट्रवादीच्या नेत्याची टीका

राष्ट्रवादीच्या आमदाराकडून तालुका अध्यक्षांना चारचाकीचं वाटप; अजितदादांच्या हस्ते केलं वाटप

माझ्यावर गुन्हा दाखल करून दाखवा; सोमय्यांचं उद्धव ठाकरेंना ओपन चॅलेंज