Home देश मोठी बातमी! अखेर भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन रद्द, सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

मोठी बातमी! अखेर भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन रद्द, सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने आज महत्त्वाचा आणि भाजपला दिलासा देणारा निर्णय दिला आहे. भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन रद्द करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.

5 जुलै रोजी विधानसभेत गदारोळ घातल्याप्रकरणी विधानसभा अध्यक्षांनी भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन केलं होतं. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दोनदा सुनावणी झाली होती. आज झालेल्या सुनावणीवेळी कोर्टाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे.

हे ही वाचा : “भाजप नेते गिरीश महाजन यांच्यासह 11 जणांविरोधात गुन्हा दाखल”

दरम्यान, राज्य सरकारच्या वकिलांनी आपली बाजू मांडताना आमदारांचं निलंबन करण्याचा अधिकार हा विधानसभेचा आहे. तो त्यांच्या कार्यकक्षेचा भाग असल्याचं म्हटलं होतं. दोन वेळा या प्रकरणावर कोर्टात सुनावणी झाली होती. त्यानंतर कोर्टाने आपला निर्णय राखून ठेवला होता. त्यावर आज अखेर निर्णय आला आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“औरंगाबादेत शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या उद्घाटनावरून मराठा क्रांती मोर्चा, एमआयएम आक्रमक; केली ‘ही’ मोठी मागणी”

सत्तेसाठी भाजपाची मदत घेणाऱ्या शिवसेनेने आम्हाला निष्ठा शिकवू नये; राष्ट्रवादीच्या नेत्याची टीका

राष्ट्रवादीच्या आमदाराकडून तालुका अध्यक्षांना चारचाकीचं वाटप; अजितदादांच्या हस्ते केलं वाटप