Home महाराष्ट्र “राज्यपालांनी हे सरकार बरखास्त करावं, भाजपनंतर आता संभाजी भिडे आक्रमक”

“राज्यपालांनी हे सरकार बरखास्त करावं, भाजपनंतर आता संभाजी भिडे आक्रमक”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

सांगली : महाराष्ट्रात किराणा दुकान आणि सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीसाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जे सुपर मार्केट एक हजार स्क्वेअर फुटाच्यावर आहे. तिथे एक स्टॉल टाकून वाईन विक्रीला मुभा देण्यात येणार आहे. ठाकरे सरकारच्या या निर्णयावरून आता शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी प्रतिक्रिया दिली.

राज्य सरकारचा हा निर्णय स्पष्ट चुकीचा आहे, असं मत संभाजी भिडेंनी यावेळी व्यक्त केलं. तसेच राज्यपालांनी हे सरकार बरखास्त करावे, अशी आक्रमक मागणी संभाजी भिडेंनी यावेळी केली. ते सांगलीत माध्यमांशी बोलत होते.

हे ही वाचा : राष्ट्रवादीत इनकमिंग सुरूच; ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीनं अजित दादांच्या उपस्थितीत हाती बांधलं घड्याळ

नरेंद्र मोदी यांचे सरकार खरोखरच चांगले आहे. भगवंताची कृपा म्हणून मिळालेले पंतप्रधान आहेत. लाल बहादूर शास्त्री जसे अफाट चांगले होते. तसेच नरेंद्र मोदी आहेत. त्याचे मन मी जाणतो. त्यांनी खरोखर देशातील दारूला तिलांजली देणारा निर्णय लोकसभेत घटनेत दुरुस्ती करून घ्यावा, असंही भिडे म्हणाले.

दरम्यान, या देशातील सर्व दारू संपली पाहिजे. गांजा शेतीच्या का आडवे पडायचे. चरस गांजा उत्पन्न करण्यासाठी हा समाज पुढे येईल. या प्रकरणी मुख्यमंत्री यांच्याशी आणि पूर्ण मंत्रिमंडळात बोलणार आहे. हा घेतलेले निर्णय समजून सांगणार आहे. राज्याने असले बोलायचे नसते. समाजाला आपण दिशा द्यायची असते. हा निर्णय संताप जनक, नाश करणारा निर्णय आहे. मला भिमाची आठवण होते. जुगाराचे नादापायी शकुनी मामांनी सगळे हरण केले. पांडव सगळं हरले. बेशरम पणाने व्यसनाच्या आहारी जाऊन पत्नीला पणाला लावले. असेही ते म्हणाले आहेत. आर आर आबांनी डान्स बार बंद केले. आज आर आर आबा असते तर हा घातकी नीच निर्णय झाला नसता. यांच्यातून नेमके काय साधायचे आहे मला कळत नाही, असंही भिडे म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी –

मोठी बातमी! अखेर भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन रद्द, सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

“भाजप नेते गिरीश महाजन यांच्यासह 11 जणांविरोधात गुन्हा दाखल”

“औरंगाबादेत शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या उद्घाटनावरून मराठा क्रांती मोर्चा, एमआयएम आक्रमक; केली ‘ही’ मोठी मागणी”