Home कोल्हापूर “…तर मी उध्दव ठाकरेंच्या घरी भांडी घासेन”

“…तर मी उध्दव ठाकरेंच्या घरी भांडी घासेन”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

कोल्हापूर : “40 आमदारांपैकी एकाने जरी 50 खोके घेतले हे जर सिद्ध केलं तर मी उद्धव ठाकरे यांच्या घरी जाऊन भांडी घासेन”, असं म्हणत शिवसेना नेते रामदास कदम यांनी उध्दव ठाकरे यांना खुलं चॅलेंज दिलं आहे.

शिवसेनेची पुढील वाटचाल कशी असावी? अशा अनेक विषयांवर चर्चा होणार आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत मला अनेक वर्ष काम करण्याची संधी मिळाली. पण महाराष्ट्रात बाप-बेटे असे दोघेजण, उद्धव ठाकरे आणि त्यांचे पिल्लू यांचं दोघांचं जर बोलणं आपण ऐकलं, त्यांचे टोमणे जर आपण ऐकले, विझताना जसे आपण फडफडतो तसे ते आता फडफडत आहेत”, अशी टीका रामदास कदम यांनी केली.

ही बातमी पण वाचा : उध्दव ठाकरेंना मोठा धक्का; ‘या’ मोठ्या नेत्याची पक्षाला सोडचिठ्ठी

अडीच वर्ष यांना मुख्यमंत्रीपद मिळालं होतं. नालायक मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलं. अडीच वर्षात अडीच तास फक्त हा मंत्रालयात बसला. आज मी त्यांना आवाहन दिलं आहे. 40 आमदारांपैकी एकाने जरी 50 खोके घेतले हे जर सिद्ध केलं तर मी उद्धव ठाकरे यांच्या घरी जाऊन भांडी घासेन. बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल”, असं रामदास कदम म्हणाले.

दरम्यान, कोल्हापूरमध्ये आज शिवसेनेचा पहिलं महाअधिवेशन सुरू आहे.यावेळी रामदास कदम बोलत होते.

महत्त्वाच्या घडामोडी – 

मनोज जरांगेनं मर्यादा ओलांडली, त्याने आपली औकात ओळखावी; नारायण राणेंचा हल्लाबोल

राज ठाकरे देणार एकनाथ शिंदेंना धक्का? शिवसेनेतील ‘हा’ मोठा नेता मनसेच्या वाटेवर

…म्हणून मी राजीनामा दिला; राजीनाम्यानंतर अशोक चव्हाणांनी दिलं स्पष्टीकरण