Home पुणे राज ठाकरे देणार एकनाथ शिंदेंना धक्का? शिवसेनेतील ‘हा’ मोठा नेता मनसेच्या वाटेवर

राज ठाकरे देणार एकनाथ शिंदेंना धक्का? शिवसेनेतील ‘हा’ मोठा नेता मनसेच्या वाटेवर

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : काँग्रेसचे राज्यातील दिग्गज नेते अशोक चव्हाण यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. अशातच आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे.

जुन्नरचे माजी आमदार शरद सोनवणे पुन्हा आपल्या स्वगृही परतण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिंदे-फडणवीसांचे सरकार आल्यानंतर शरद सोनवणे हे शिंदेंच्या शिवसेनेत सहभागी झाले होते. शरद सोनवणे यांच्याकडे सध्या शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी आहे. पण शरद सोनावणे आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश करु शकतात.

ही बातमी पण वाचा : लोकं येत असतात जात असतात, एका व्यक्तीच्या जाण्याने पक्ष कोसळत नाही – विजय वडेट्टीवार

शरद सोनावणे यांनी 2014 च्या विधानसभा निवडणुकीआधी शिवसेनेतून मनसेत प्रवेश केला होता आणि आमदार झाले होते. त्यावेळी ते मनसेचे एकमेव आमदार होते. त्या नंतर 2019 च्या विधानसभा निवडणुकीआधी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेच्या तिकीटावर त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली. पण त्यांचा पराभव झाला होता.

दरम्यान, आता शरद सोनावणे स्वगृही म्हणजे मनसेमध्ये परतण्याची शक्यता आहे. ओझर येथील कार्यक्रमात शरद सोनवणे हे राज ठाकरेंसोबत पाहायला मिळाले. त्यामुळे ही शक्यता व्यक्त केली जात आहे.

महत्त्वाच्या घडामोडी – 

…म्हणून मी राजीनामा दिला; राजीनाम्यानंतर अशोक चव्हाणांनी दिलं स्पष्टीकरण

“अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर, देवेंद्र फडणवीसांचं सूचक विधान, म्हणाले…”

मोठी बातमी! काँग्रेसला मोठा धक्का; अशोक चव्हाण करणार भाजपमध्ये प्रवेश?