Home महाराष्ट्र “अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर, देवेंद्र फडणवीसांचं सूचक विधान, म्हणाले…”

“अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर, देवेंद्र फडणवीसांचं सूचक विधान, म्हणाले…”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर असताना काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे.

काँग्रेसचे वरिष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. अशोक चव्हाण यांनी विधानसभा आमदारकीचा राजीनामा दिला आहे. अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर अनेक चर्चांनी जोर धरला आहे. अशातच आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठं विधान केलं आहे.

ही बातमी पण वाचा : मोठी बातमी! काँग्रेसला मोठा धक्का; अशोक चव्हाण करणार भाजपमध्ये प्रवेश?

आज मी तुम्हाला एवढच सांगेन आगे, आगे देखिये होता हैं क्या…असे म्हणत, देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यावर बोलत असताना सूचक वक्तव्य केलं. मुंबईतील नरीमन पॉइंट येथील भाजप मुख्यालयात फडणवीसांची पत्रकार परिषद झाली. त्यात ते बोलत होते.

काँग्रेसमधील अनेक चांगले नेते भाजपच्या संपर्कात आहेत. ज्याप्रकारे गेले अनेक वर्ष काँग्रेस पक्ष वाटचाल करत आहे, त्यातील जनतेशी संपर्क असणाऱ्या नेत्यांची काँग्रेसमध्ये गुदमर होतेय. देशभरात हाच ट्रेंड आहे. जनतेचे नेते भाजपमध्ये प्रवेश करतायत. त्यामुळे काही मोठे नेते भाजपमध्ये येतील हा विश्वास आहे., असं फडणवीस म्हणाले.

महत्त्वाच्या घडामोडी – 

माझ्या नादाला लागू नका, नाहीतर…; एकनाथ शिंदे यांचा मोठा इशारा

निखिल वागळेंनी मर्यादित…; कायदा सुव्यवस्थेवरून अमृता फडणवीसांचा, वागळेंना सल्ला

रोटरी क्लब ऑफ पुणे वेस्ट साईड कडून गोपाळकृष्ण शाळेस संगीत वाद्यांची मदत