Home पुणे रोटरी क्लब ऑफ पुणे वेस्ट साईड कडून गोपाळकृष्ण शाळेस संगीत वाद्यांची मदत

रोटरी क्लब ऑफ पुणे वेस्ट साईड कडून गोपाळकृष्ण शाळेस संगीत वाद्यांची मदत

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : गोखलेनगर येथील गोपाळकृष्ण प्राथमिक विद्यामंदिर या शाळेला रोटरी क्लब ऑफ पुणे वेस्ट साईड यांच्या कडून ढोल, ताशा, स्टीलचे लेझीम, झांज अशी विविध प्रकारची संगीत वाद्यांची मदत देण्यात आली आहे.

रोटरी क्लब ऑफ पुणे वेस्ट साईड नेहमीच असे विविध समाजोपयोगी उपक्रम राबवून विविध शाळांना मदत करत असते. रोटरी क्लब ऑफ पुणे वेस्ट साईडच्या अध्यक्षा रुपाली गजेश्वर व सचिव विश्वजित धोत्रे यांचे पुढाकारातून सदर संगीत वाद्यांची मदत प्रशालेस मिळाली.

ही बातमी पण वाचा : बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न पुरस्कार द्या; राज ठाकरे यांची केंद्र सरकारकडे मागणी

प्रशालेत विद्यार्थ्यांना लेझीम खेळाचे प्रशिक्षण, मार्गदर्शन करून बालचमुंचे लेझीम पथक तयार केले जाणार असून शिवजयंतीदिनी ढोल ताशाचा आवाज प्रशालेत घुमणार असल्याचे रणजित बोत्रे यांनी सांगितले. शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री कासार, गीतांजली कांबळे, रणजित बोत्रे, मंदाकिनी बलकवडे यावेळी उपस्थित होते.

महत्त्वाच्या घडामोडी – 

“ठाकरे गटाचे नेते अभिषेक घोसाळकर गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट, पोलिसांनी ‘त्या’ व्यक्तीला केली अटक”

“ब्रेकींग न्यूज ! ठाकरे गटाचे नेते अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार, उपचारादरम्यान मृत्यू”

मोठी बातमी! जळगावमधून भाजपच्या माजी नगरसेवकार गोळीबार