Home महाराष्ट्र …म्हणून मी राजीनामा दिला; राजीनाम्यानंतर अशोक चव्हाणांनी दिलं स्पष्टीकरण

…म्हणून मी राजीनामा दिला; राजीनाम्यानंतर अशोक चव्हाणांनी दिलं स्पष्टीकरण

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर असताना काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे.

काँग्रेसचे वरिष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. अशोक चव्हाण यांनी विधानसभा आमदारकीचा राजीनामा दिला आहे. अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर अनेक चर्चांनी जोर धरला आहे.

या राजीनाम्यांनंतर अशोक चव्हाण भाजपात जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात चालू आहे. तसेच काही वृत्तवाहिन्यांनी दावा केला आहे की, अशोक चव्हाण हे 15 फेब्रुवारी रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश करतील. आता खुद्द अशोक चव्हाणांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.

ही बातमी पण वाचा : “अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर, देवेंद्र फडणवीसांचं सूचक विधान, म्हणाले…”

मी काँग्रेसमध्ये असताना नेहमी प्रामाणिकपणे काम केलं. माझी पक्षासह कोणाबद्दल कसलीही तक्रार नाही, राजीनामा देण्यामागे कुठलीही व्यक्तीगत भावना नाही., असं अशोक चव्हाण म्हणाले. ते माध्यमांशी बोलत होते.

प्रत्येक गोष्टीला काही कारण असलंच पाहिजे असं काही नाही. तसेच प्रत्येक कारण सर्वांना सांगितलंच पाहिजे असंही काही नाही. सगळ्याच गोष्टी जाहीर केल्या जात नाहीत. मी कधीही माझ्या पक्षांतर्गत बाबी लोकांसमोर, माध्यमांसमोर मांडल्या नाहीत. तसेच पक्षात काही उणीदुणी असतील तर मी ती कधीही चव्हाट्यावर मांडली नाहीत. मी सुरुवातीपासून काँग्रेसमध्ये आहे. आता मला वाटतं की, मी अन्य पर्याय पाहिले पाहिजेत म्हणून राजीनामा दिला आहे. काँग्रेस सोडणं हा माझा वैयक्तिक निर्णय आहे., असं स्पष्टीकरण अशोक चव्हाणांनी यावेळी दिलं.

महत्त्वाच्या घडामोडी – 

मोठी बातमी! काँग्रेसला मोठा धक्का; अशोक चव्हाण करणार भाजपमध्ये प्रवेश?

माझ्या नादाला लागू नका, नाहीतर…; एकनाथ शिंदे यांचा मोठा इशारा

निखिल वागळेंनी मर्यादित…; कायदा सुव्यवस्थेवरून अमृता फडणवीसांचा, वागळेंना सल्ला