Home पुणे राष्ट्रवादीचा ‘हा’ नेता म्हणतो… आमच्यासाठी अजित पवार हेच मुख्यमंत्री!

राष्ट्रवादीचा ‘हा’ नेता म्हणतो… आमच्यासाठी अजित पवार हेच मुख्यमंत्री!

293

पुणे : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हेच आमच्यासाठी मुख्यमंत्री, असं वक्तव्य राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी केलं आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेतील एक पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.

महाविकासआघाडी सरकारमध्ये अजित पवारांना मंत्रिपद मिळणार असल्याची चर्चा असताना तुम्हाला कोणतं पद मिळणार? असं प्रश्न विचारला असता, “अरे आमच्यासाठी दादा हेच मुख्यमंत्री आहेत.” असं बनसोडे म्हणाले.

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वातील राज्य मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार लवकरच होणार असल्याचे बोललं जात आहे. त्यामुळे ठाकरेंच्या मंत्रिमंडळात सहभागी होण्यासाठी अनेक आमदारांनी जोरदार लॉबिंग सुरु केली आहे.

दरम्यान, अजित पवार यांनी रातोरात भाजपशी हातमिळवणी करत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यांवेळी राष्ट्रवादीतील काही आमदारांनी पाठिंबा दिला होता. त्यात अण्णा बनसोडे यांच्या नावाचाही समावेश होता.

महत्वाच्या घडामोडी-

-पाकिस्तानी संघाने विराट कोहलीकडून शिकायला हवं- शोएब अख्तर

-शरद पवारांनी सोयीची भूमिका घेऊ नये, अन्यथा… देवेंद्र फडणवीस म्हणतात…

-झारखंडच्या जनतेने भाजपचा अहंकार धुळीस मिळवला- नवाब मलिक

-झारखंडमध्ये काँग्रेसची सत्ता येणार ; एक्झिट पोलने वर्तवला अंदाज