Home पुणे “शरद पवारांनी सोयीची भूमिका घेऊ नये, अन्यथा… देवेंद्र फडणवीस म्हणतात…

“शरद पवारांनी सोयीची भूमिका घेऊ नये, अन्यथा… देवेंद्र फडणवीस म्हणतात…

पुणे: भीमा- कोरेगाव प्रकरणात शरद पवार यांनी सोयीची भूमिका घेऊ नये. त्यामुळे राज्यातील पोलिसांचे मनोबल खच्ची होईल, असं वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते पुण्यात पत्रकारपरिषदेत बोलत होते.

भीमा-कोरेगाव संदर्भात शरद पवारांनी केलेली वक्तव्ये ऐकून मला आश्चर्य वाटलं. याप्रकरणात अटक झालेल्या सुधीर ढवळे, अरब फरेरा यांना आघाडीचे सरकार असतानाही अटक झाली होती. मग त्यांच्या काळात झालेले निर्णय योग्य आणि आमच्या काळात या सगळ्यांना अटक झाली तर तो जातीयवाद कसा ठरू शकतो? असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केला.

शरद पवारांच्या या सोयीच्या भूमिकेमुळे राज्यातील पोलिसांचे खच्चीकरण होऊ शकतं, अशी भीती देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, नक्षलवादी संबंधित पुस्तक सापडलं म्हणजे तो गुन्हा ठरत नाही. आमच्य़ाही घरी नक्षलवादाचे पुस्तक आहे. आम्हीही माहिती घेतो म्हणजे तो गुन्हा ठरत नाही, असंही फडणवीस म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

-झारखंडच्या जनतेने भाजपचा अहंकार धुळीस मिळवला- नवाब मलिक

-झारखंडमध्ये काँग्रेसची सत्ता येणार ; एक्झिट पोलने वर्तवला अंदाज

-मी पाहिलेले उद्धव ठाकरे हे नाहीत, ते ‘या’ थराला जातील असं वाटलं नव्हतं- देवेंद्र फडणवीस

-कटक वनडेत भारताचा विराट विजय; 2-1 ने जिंकली मालिका