Home क्रीडा पाकिस्तानी संघाने विराट कोहलीकडून शिकायला हवं- शोएब अख्तर

पाकिस्तानी संघाने विराट कोहलीकडून शिकायला हवं- शोएब अख्तर

252

लाहोर : पाकिस्तानच्या क्रिकेट संघाने भारतीय संघाचं अनुकरण करायला हवं. त्याचबरोबर पाकिस्तानी संघाने विराट कोहलीकडून शिकायला हवं. असं विधान पाकिस्तानचा माजी जलदगती गोलंदाज शोएब अख्तरने आपल्या युट्यूब चॅनेलवर केलं आहे.

मी भारतीय क्रिकेट संघाची प्रगती पाहिली आहे. पाकिस्तान आपल्या आक्रमक क्रिकेटमुळे ओळखला जातो. आम्ही कधीही भेदरट नव्हतो. आम्ही आक्रमक होतो आणि लढा द्यायचो, असंही शोएब अख्तरने म्हटलं आहे.

आमच्या कर्णधाराची तुलना भारतीय कर्णधाराशी करा. कर्णधार अजहर अली आणि मिसबाह उल हक यांनी असे प्रयत्न करायला हवेत, ज्यामुळे पाकिस्तानचा संघ चांगला तयारीचा होईल, असं मत शोएब अख्तरने व्यक्त केलं आहे.

रोडमॅप असायला हवा की आपल्याला विराट कोहलीच्या संघापेक्षा कसं चांगलं खेळायचं आहे, असंही शोएब अख्तर म्हणाला.

महत्वाच्या घडामोडी-

-शरद पवारांनी सोयीची भूमिका घेऊ नये, अन्यथा… देवेंद्र फडणवीस म्हणतात…

-झारखंडच्या जनतेने भाजपचा अहंकार धुळीस मिळवला- नवाब मलिक

-झारखंडमध्ये काँग्रेसची सत्ता येणार ; एक्झिट पोलने वर्तवला अंदाज

-मी पाहिलेले उद्धव ठाकरे हे नाहीत, ते ‘या’ थराला जातील असं वाटलं नव्हतं- देवेंद्र फडणवीस