राष्ट्रवादीच्या सहकार पॅनेललाच सर्वाधिक मते मिळणार- शिवेंद्रराजे भोसले

0
750

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

सातारा : सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या सहकार पॅनेललाच सर्वाधिक मते मिळणार असल्याचा दावा आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी यावेळी केला.

हे ही वाचा : “मनसेचा मोठा निर्णय; रायगड, राजगड, पन्हाळागडासह 11 किल्ल्यांवर शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंच्या अस्थींचं विसर्जन करणार”

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने सत्ताधारी सहकार पॅनेलच्या प्रचारार्थ सातारा येथील कै. अभयसिंहराजे भोसले सांस्कृतिक भवन येथे सातारा तालुक्यातील मतदारांचा मेळावा झाला. यावेळी ते बोलत होते

मागील 5 वर्षात बँकेचा अध्यक्ष म्हणून उल्लेखनीय कामकाज केले. सर्व सहकारी संचालकांच्या सहकार्याने आणि आपल्या सर्वांच्या आशिर्वादामुळेच हे शक्य झाले आणि याचा मला सार्थ अभिमान आहे, असं शिवेंद्रसिंहराजे म्हणाले.

दरम्यान, राज्यातच नाही तर देशभरात आपल्या बँकेचे नाव अग्रेसर आहे आणि बँकेची घोडदौड कायम ठेवण्यासाठी सहकार पॅनेलच्या सर्व उमेदवारांना निवडून आणणे आवश्यक आहे. सातारा तालुक्यातील मतदार विरोधकांच्या भूलथापांना बळी न पडता सहकार पॅनेलच्या पाठीशी 100 टक्के उभे राहतील, असा विश्वासही शिवेंद्रराजेंनी यावेळी व्यक्त केला.

महत्वाच्या घडामोडी –

“राष्ट्रवादीनंतर आता शिवसेनेचाही काँग्रेसला दणका; काँग्रेस नगराध्यक्षाचा शेकडो समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश”

विक्रम गोखले म्हणाले, कंगना योग्यच बोलली, आता शरद पवार म्हणतात…

“ग्रामीण भागातही मनसे सुसाट; ‘नवनिर्माण जनसंपर्क यात्रे’ला जोरदार प्रतिसाद”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here